गो रक्षा मंत्री असे पद असणे गरजेचेसंभाजी भिडे ; गौ टेक ग्लोबल समिट व एक्स्पोची सांगता
पुणे : देश टिकायचा असेल, तर देशातील मुलांनी गंगामाता, गीता माता, भारत माता, गौ माता, भारत माता, दुर्गामाता या सगळ्या माता एकच आहेत असे मानले पाहिजे. या सातही मातांवर आक्रमण करणारा माणूस वध्य असला पाहिजे. गोहत्या बंदी कायदा नाही, तर गो संवर्धन कायदा असे त्याला म्हटले पाहिजे. गो हत्या करणाऱ्याला ठार मारणाऱ्या व्यक्तीला संरक्षण देणारे सरकार प्रत्येक राज्यात पाहिजे. गो रक्षा मंत्री असे पद देखील असले पाहिजे, असे मत संभाजी भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय संस्था ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज (जीसीसीआय) यांच्या वतीने, महाराष्ट्र गो सेवा आयोग आणि आर. आर. काबेल यांच्या सहकार्याने “गौ टेक २०२६” या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद व प्रदर्शनाचे आयोजन कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे येथे करण्यात आले होते. त्याचा समारोप नुकताच झाला. या प्रदर्शनाला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, अभिनेता जॅकी श्रॉफ यांसह अनेक मान्यवरांनी भेट दिली.
जीसीसीआयचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री तसेच राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया, महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष व गौ टेक २०२६ चे आयोजनाध्यक्ष शेखर मुंदडा यावेळी उपस्थित होते. गायीच्या माध्यमातून मिळणारी विविध उत्पादने याविषयी प्रदर्शनात विविध कार्यक्रम चर्चासत्रे तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिला बचत गटांचे स्टॉल देखील प्रदर्शनात आहेत. चार दिवसीय कार्यक्रमात गौप्रेमींनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट दिली.
संभाजी भिडे म्हणाले, पाश्चात्य संस्कृती आपण स्वीकारली. जे जे पाश्चात्य आहे ते विश्वाला घातक आहे. नेहरू नावाचा एक देशद्रोही पंतप्रधान होऊन गेला. त्या बेकार माणसाने जर्सी नावाची एक परकीय जात आणली आणि देशाचा नाश झाला. खूप दुध देते, या नावाखाली देशात जर्सी गाय आपण पोसतो. आपण सर्वांनी पंतप्रधानांना आवाहन करा की जर्सी नावाचा प्रकार या देशात असता कामा नये.
ते पुढे म्हणाले, मागील ७३ वर्षात बराच काळ देशाला घातक असणारा काँग्रेस पक्ष राज्य करत होता. भगवंताची इच्छा मागील १० ते १५ वर्षात मोदी नावाच्या एका देव माणसाने बऱ्याच राज्यातून देश, देव आणि धर्माला मांडणारी हिंदुत्वाची सरकार आणली आहे. आज पोलीस खात्यात सुद्धा गो संरक्षणाला अडथळा आणणारे खूप लोक आहेत. गोरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक एसपी असायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. वल्लभभाई कथिरिया यांच्या मार्गदर्शनाखाली या आयोजनात शेखर मुंदडा, रमेश घेटीया, हंसराज गजेरा, अमिताभ भटनागर (जनरल सेक्रेटरी, जीसीसीआय), पुरीश कुमार (जनरल सेक्रेटरी, जीसीसीआय), डॉ. गिरीश शाह, डॉ. नितीन मार्कंडेय, संजय भोसले, उद्धव नेरकर, डॉ. सुनील सूर्यवंशी, सनत कुमार गुप्ता, मनीष वर्मा, परेश शाह तसेच इतर अनेकांसह डॉ. दिलीप कुलकर्णी, मंगल अकोले, डॉ. महेश लोहार, विनायक बोरोळे पाटील, कौस्तुभ देशपांडे, मल्हार चनियारा, रमेश ओसवाल, भाग्यश्री चौंडे, अश्विनी पाटील, डॉ. देशमुख, राजेंद्र चौहान, दिलीप काळे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
फोटो ओळ : ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज यांच्या वतीने महाराष्ट्र गो सेवा आयोग आणि आर. आर. काबेल यांच्या सहकार्याने “गौ टेक २०२६” या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे येथे करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर.
