February 4, 2026

पालखी मिरवणुकीने महालक्ष्मी मंदिरातील ब्रह्मोत्सवाचा समारोपश्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवाची सांगता

0
IMG-20260203-WA0041
Spread the love


पुणे : माता माता की जय… गोविंद बोलो हरी गोपाल बोलो… ज्या नामघोषाने सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिराचे प्रांगणात दुमदुमून गेले. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीच्या उत्सव मूर्तींची मंदिराच्या प्रांगणात थाटात मिरवणूक काढण्यात आली. ब्रह्मोत्सवानिमित्त या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालखी सोहळ्यानंतर पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी हा अनोखा कार्यक्रम देखील मंदिरात मोठया उत्साहात पार पडला.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवात मंदिरात विविध कार्यक्रम सुरु होते. त्याचा समारोप पालखी मिरवणुकीने झाला. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, प्रविण चोरबेले, नारायण काबरा, भरत अग्रवाल, रमेश पाटोदिया, तृप्ती अग्रवाल, राजेश संकला यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुजाचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्य जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पडला. गरुड, यज्ञ स्थापनेसारख्या धार्मिक कार्यक्रमांपासून ते विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, पालखी सोहळ्यामध्ये महिलांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. तसेच अनेक पारंपरिक खेळ देखील सादर केले. याशिवाय ब्रह्मोत्सवात उत्सव मूर्तींची धान्यतुला करुन ते धान्य गरजूंना देण्याचा उपक्रम देखील पार पडला. देवीला सोने-चांदी पुष्पअर्पण करुन देवीचरणी विश्वाच्या सुख-शांती समृद्धीकरीता प्रार्थना करण्यात आली. धार्मिक कार्यक्रमामध्ये होम-हवन, महाअभिषेक असे विविध कार्यक्रम देखील मंदिरात पार पडले.

  • फोटो ओळ : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवाला मंदिरात उत्सवमूर्तींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर व भाविक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी