February 15, 2026

लॅम्प लायटिंग करीत नर्सिंगच्या विद्यार्थीनींनी घेतली रुग्णसेवेची शपथन-हे येथील कॉलेज आॅफ नर्सिंगच्या विद्यार्थीनींनी घेतली शपथ

0
IMG-20260121-WA0014
Spread the love

पुणे : रुग्णांची अविरतपणे सेवा करू व त्यांचा आयुष्यातील अंधार दूर करून त्यांना प्रकाशाकडे नेऊ अशी शपथ लॅम्प लायटिंगच्या कार्यक्रमात नर्सिंगच्या विद्यार्थीनींनी घेतली. जगातील पहिली परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी मेणबत्ती घेऊन रुग्णांची सेवा केली, त्याचप्रकारे आपण देखील रुग्णांची अविरतपणे सेवा करू व त्यांचा आयुष्यातील अंधार दूर करून त्यांना प्रकाशाकडे नेऊ यासाठी लॅम्प लायटिंग करून शपथ घेतली जाते. रुग्णसेवा करीत आपले कार्य प्रामाणिकपणे बजावण्याचा निर्धार नर्सिंगचा कोर्स करणा-या विद्याथीर्नींनी केला.

न-हे येथील कै.उद्धवराव तुळशीराम जाधवर फाऊंडेशन संचलित कॉलेज आॅफ नर्सिंग मधील नर्सिंगच्या विद्याथीर्नींचा लॅम्प लायटिंग करून शपथ ग्रहण कार्यक्रम संस्थेच्या सभागृहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ महाराष्ट्र प्रबंधक वैशाली राऊत, बीजे मेडिकल कॉलेजच्या नर्सिंग विभागाच्या प्रा. डॉ. शर्मिला धुमाळ, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या डॉ.एम.एम. गोसावी इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग एज्युकेशन अँड ट्रेनिंग रिसर्चच्या प्रिन्सिपल डॉ. ज्योती ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर, नर्सिंगच्या प्राचार्या शितल निकम यांसह प्राध्यापक, पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, जगातील पहिली परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल या आधुनिक नर्सिंग आंदोलनाच्या जनक मानल्या जातात. त्यांचा जन्म १२ मे १८२० रोजी झाला. त्यांच्या जन्म एका समृद्ध आणि उच्चवर्णीय कुटुंबामध्ये झाला. उच्च कुटुंबात जन्माला आलेल्या फ्लोरेन्स यांनी सेवेचा मार्ग स्वीकारला. त्या काळच्या दवाखान्यातील भयानक परिस्थितीमुळे घरच्यांचा परिचर्येसाठी विरोध होता. परिवाराचा तीव्र विरोध असताना देखील त्यांनी अभावग्रस्त लोकांच्या सेवेचे व्रत घेतले.

क्रिमिया युद्धामध्ये जखमी रुग्णांची त्यांनी खूप सेवा केली होती. या युद्धातील जखमी सैनिकांवर रात्रीच्या अंधारात मेणबत्तीच्या प्रकाशात त्या जखमी रुग्णांची सेवा, सुश्रुषा करीत असत. त्यामुळे या युद्धानंतर दया आणि सेवेची मूर्ती असलेल्या फ्लोरेन्स नाइटिंगेल द लेडी विथ द लॅम्प या नावाने प्रसिद्ध झाल्या. युद्धानंतर त्यांची प्रसिद्धी इंग्लंडमध्ये देखील पोहोचली. यानंतर १९६० साली त्यांनी लंडनमध्ये नर्सिंग स्कूलची स्थापना केली. भारतीय सैनिकांमध्ये स्वच्छता या विषयावर त्यांनी खूप काम केले आहे. त्यामुळे १८७३ साली सैनिकांचा मृत्यूदर ६९ हून कमी होऊन प्रती हजार १८ एवढा झाला. त्यांचा मृत्यू १३ आॅगस्ट १९१० रोजी झाला. प्रत्येक वर्षी भारतात उल्लेखनीय कार्य करणा-या परिचारिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल अ‍ॅवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

  • फोटो ओळ : न-हे येथील कॉलेज आॅफ नर्सिंग मधील नर्सिंगच्या विद्याथीर्नींनी नुकतीच लॅम्प लाइटिंग करून शपथ घेतली. यावेळी लॅम्प लाइटिंग करून रुग्णसेवेची शपथ घेताना विद्यार्थिनी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी