April 1, 2026

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी बंडा जोशी यांचा सत्कार

0
IMG-20251104-WA0023
Spread the love

पुणे : ज्येष्ठ रंगकर्मी, एकपात्री कलावंत बंडा जोशी यांच्या धम्माल विनोदी विडंबन गीतांचा ‌‘झेंडूची नवी फुले‌’ या एकपात्री कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या प्रयोगानिमित्त रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम रविवार, दि. 9 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. बंडा जोशी यांचा सन्मान ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते करण्यात येणार असून ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप आहे.
आचार्य अत्रे लिखित ‌‘झेंडूची फुले‌’ या विडंबन कविता संग्रहास 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ‌‘झेंडूची नवी फुले‌’ या हास्य मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

फोटो : बंडा जोशी
प्रति,
मा. संपादक
ज्येष्ठ रंगकर्मी, एकपात्री कलावंत बंडा जोशी यांच्या धम्माल विनोदी विडंबन गीतांचा ‌‘झेंडूची नवी फुले‌’ या एकपात्री कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या प्रयोगानिमित्त रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या सत्काराला कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला आहे. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

ॲड. प्रमोद आडकर, अध्यक्ष, रंगत-संगत प्रतिष्ठान
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 9922907801

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी