January 19, 2026

लावणी कलावंताना लोकाश्रय मिळाला राजाश्रय देखील मिळावा – संदीप खर्डेकर.

0
IMG-20250929-WA0010(1)
Spread the love

“तुमच्यासाठी काय पण” लावणीचे सादरीकरण व कलावंतांचा सत्कार संपन्न.

सुशिक्षित समाजाने “लावणी” ह्या लोककले कडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला पाहिजे असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले. ह्या कलेला ग्रामीण भागात लोकाश्रय मिळाला मात्र शहरी भागात अजूनही “लावणी” चा कार्यक्रम म्हंटलं की नाकं मुरडली जातात याची खंत वाटते, लावणी कलावंतांना मिळणारी दीड हजार रुपयाची पेन्शन तुटपुंजी असून त्यांचे वय झाले की होणारी हेळसांड थोपविण्यासाठी योजना आखली पाहिजे असेही ते म्हणाले व ह्या कलेला राजाश्रय लाभावा असे मत ही खर्डेकर यांनी व्यक्त केले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित कोथरूड नवरात्र महोत्सवात आज लावण्यांचा कार्यक्रम पार पडला त्या वेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर,भाजपा चे शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर,मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, उत्सव प्रमुख उमेश भेलके, सौ. अक्षदा भेलके, सौ. कल्याणी खर्डेकर,सौ. श्वेताली भेलके, सुधीर फाटक, चंदन बकरे, दिलीप ठोंबरे,राजेंद्र जाधव इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब दाभेकर व रवींद्र साळेगावकर यांच्या हस्ते लावणी कलावंत पूनम कुडाळकर,रक्षा पुणेकर, काव्या पुणेकर, पियू मुंबईकर, वैशाली गायकवाड यांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला.
आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुशिक्षित आणि “व्हाईट कॉलर्ड” नागरिकांच्या भरगच्च उपस्थितीत लावणी चा बहारदार कार्यक्रम सादर करताना आनंद होतं आहे असे लावणी विषयात पी एच डी केलेले योगेश देशमुख म्हणाले.
रोजच वाघजाई देवी ला साडी नेसविणाऱ्या सौ.तन्वी सूर्यवंशी, सौ.वरदायीनी भेंडे यांचा देखील यावेळी कल्याणी खर्डेकर, अक्षदा भेलके व श्वेताली भेलके सत्कार करण्यात आला.
लावणी च्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केल्याबद्दल सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी कोथरूडकरांचे आभार मानले.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष – क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button