दगडूशेठ’ गणपती मंदिराला युनिव्हर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डजागतिक स्तरावर सर्वाधिक भेट दिलेल्या आध्यात्मिक स्थळांपैकी एक
‘
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला युनायटेड स्टेट्स ऑफ मिसूरी, अमेरिका येथील युनिव्हर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांचेमार्फत एकाच मंदिरात वर्षभर जास्तीत जास्त भाविकांच्या भेटीचा जागतिक विक्रम केल्याबद्दल अधिकृतपणे मान्यता दिली आहे. याबद्दलचे प्रमाणपत्र गणेशोत्सवात ट्रस्टला प्रदान करण्यात आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाचे विश्वस्त व पदाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र स्वीकारले. सदर सन्मान संपूर्ण वर्षामध्ये भाविकांच्या सतत येणाऱ्या गर्दीची दखल घेत देण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात आहे. विविध देशांतून भाविक मोठ्या संख्येने गणरायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येतात. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे जागतिक स्तरावर सर्वाधिक भेट दिलेल्या आध्यात्मिक स्थळांपैकी एक बनले आहे. युनिव्हर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि जागतिक नोंदणीच्या अधिकृत समितीने हा विक्रम सत्यापित आणि प्रमाणित केला आहे.
