टोयोटा मोटर्सची कॅम्री हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल – स्प्रिंट एडिशन दाखल
पुणे,१८ ऑगस्ट २०२५: टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. (टीकेएम) ने आज आपल्या आयकॉनिक लक्झरी हायब्रिड इलेक्ट्रिक सेडानची नवी आवृत्ती कॅम्री हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल – स्प्रिंट एडिशन दाखल केली. ड्युअल-टोन एक्सटेरियर, मॅट ब्लॅक फिनिशेस आणि एक्सक्लुझिव्ह स्पोर्ट्स किट असलेली ही कार डायनॅमिक डिझाइन आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सचा सुंदर मिलाफ आहे. स्प्रिंट एडिशन ही उत्साही व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक असून, ड्रायव्हिंगचा रोमांचक अनुभव व स्पोर्टी एलिगन्स शोधणाऱ्यांसाठी खास डिझाइन केली आहे.
