सुवर्णयुग तरुण मंडळ दहीहंडी उत्सव शनिवारी (दि.१६)तब्बल ४० फूट एलईडी वॉलद्वारे श्रीकृष्ण लीला दर्शन
पुणे : संपूर्ण पुण्याच्या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षक असलेल्या सुवर्णयुग तरुण मंडळाचा उत्सव शनिवारी (दि.१६) आयोजित करण्यात आला आहे. यंदा तब्बल ४० फूट एलईडी वॉलद्वारे गोपाळभक्तांना श्रीकृष्ण लीला दर्शन होणार असून दहीहंडी फोडण्याचा मुख्य कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी दिली.
बेलबाग चौकाजवळ असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या पारंपरिक जागेत ही एलईडी वॉल उभारण्यात आली आहे. शनिवारी दुपारी ४ ते ६ यावेळेत नादब्रम्ह ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्टचे वादक पारंपरिक वाद्यवादन करणार आहेत. त्यानंतर दहीहंडी फोडण्याचा मुख्य कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होईल. दहीहंडी फोडणाऱ्या संघाला रोख रक्कम ५१,००० व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. तरी गोपाळभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
