February 16, 2026

प्रेसनोट प्रसिद्धीसाठीअखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’विजेत्यांना एकूण २ लाख ५० हजार रुपयांची पारितोषिके ; सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर चे प.पू. कृष्णा महाराज ढोणे (वाघापूरे) यांच्या हस्ते महाआरतीने उत्सवाची सांगता

0
IMG-20250806-WA0033
Spread the love

पुणे : शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट चा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांसाठी होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा आणि चालता बोलता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दोन हजाराहून अधिक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला.

महिलांसाठी आयोजित या विशेष कार्यक्रमाला स्टार प्रवाह वाहिनीवरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील अभिनेता विशाल निकम, अभिनेत्री पूजा बिरारी, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, सारिका निंबाळकर आदी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण २ लाख ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली.

कार्यक्रमात पाच विजेत्यांना मानाची बक्षिसे देण्यात आली. त्यामध्ये येवला पैठणी, सोन्याची नथ, टीव्ही, स्मार्ट फोन, वॉटर प्युरीफायर, गॅस शेगडी यांसह विविध प्रकारच्या १३ नित्योपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. उत्सवाची सांगता सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर चे प.पू. कृष्णा महाराज ढोणे (वाघापूरे) यांच्या हस्ते महाआरतीने झाली.

वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले. उत्सवात ५ दिवस अन्नदान सेवा, सकाळी रुद्राभिषेक व रुद्रयाग आणि दुपारी शहर व जिल्ह्यातील भजनी मंडळाची सेवा तसेच ढोल ताशा वादन देखील झाले.

  • फोटो ओळ : शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट चा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला होते. त्यामध्ये महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ मधील विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली. तसेच उत्सवाची सांगता सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर चे प.पू. कृष्णा महाराज ढोणे (वाघापूरे) यांच्या हस्ते महाआरतीने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी