रिपब्लिकन नेते राजु गोडबोले च्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.21- भारतीय दलित पँथर पासुन आंबेडकरी चळवळीत काम करणारे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ; रिपब्लिकन पक्षाचे छत्तीसगढ राज्य सरचिटणीस राजू गोडबोले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.दिवंगत राजु गोडबोले हे छत्तीसगढ मधील रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.त्यांना छत्तीसगढ मधील सामाजिक शैक्षणिक आणि बौध्द धम्म चळवळी बरोबरच रिपब्लिकन चळवळ वाढवण्यात मोठे योगदान दिले आहे.माझ्या नेतृत्वात त्यांनी भारतीय दलित पँथर पासुन एकनिष्ठपणे रिपब्लिकन पक्षाचे काम केले आहे.राजु गोडबोले यांच्या निधनाने रिपब्लिकन पक्षासोबत सबंध छत्तीसगढ मधील आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवगंत राजु गोडबोले यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.
छत्तीसगढच्या भिलाई येथील सियान सदन येथे रिपब्लिकन पक्षा तर्फे दिवंगत राजु गोडबोले यांची जाहीर श्रध्दांजली सभा आयोजित करण्यात आली होती. दिवंगत राजु गोडबोले हे रिपब्लिकन पक्षाचे छत्तीसगढ मधील प्रदेश सरचिटणीस होते.छत्तीसगढच्या रायपुर,भिलाई, राजनांदगाव सह पुर्ण छत्तीसगढ मध्ये रिपब्लिकन चळवळ वाढवण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भिलाई मध्ये रस्त्याला नाव देऊन तसेच एखादे सभागृह उभारून दिवंगत राजू गोडबोले यांच्या स्मृती जोपासूया अशा शब्दांत ना.रामदास आठवले यांनी दिवंगत राजू गोडबोले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
दिवगंत राजु गोडबोले यांच्या श्रध्दांजली सभेत ना.रामदास आठवले यांच्या समवेत छत्तीसगढ चे रिपाइं चे प्रदेश अध्यक्ष उषाताई आफले , राष्ट्रीय सचिव विजय प्रसाद गुप्ता,अभिषेक वर्मा, यशवंत ठाकरे,सुनिल रामटेके,गोजुपाल तसेच दिवगंत राजु गोडबोले यांच्या पत्नी शैलिन्द्रा गोडबोले,मुले आणि सर्व शोकाकुल उपस्थित होता.
दिवगंत राजु गोडबोले यांचे 1 जुलै रोजी दु:खद निधन झाले.त्यांच्या निधनाची वार्ता कळताच ना.रामदास आठवले यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम स्थगीत करून तातडीने रायपुर मधुन भीलई येथील दिवगंत राजु गोडबोले यांच्या निवासस्थानी भेट दिली होती.ना.रामदास आठवले यांचे आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या कुंटुंबा प्रमाणे प्रेम करतात. दिवंगत राजु गोडबोले या आपल्या जुन्या सहकाऱ्याचे निधन झालेले कळताच तातडीने राजु गोडबोले यांच्या निवासस्थानी ना . रामदास आठवले दाखल झाले होते. त्यांनी राजु गोडबोले यांच्या पार्थीवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रध्दाजंली वाहीली होती. आज दिवगंत राजु गोडबोले यांच्या जाहिर श्रध्दांजली सभेत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शोकाकुल गोडबोले परिवाराला 1 लाख रुपयांची सांत्वनपर मदत ही ना.रामदास आठवले यांच्या हस्ते देण्यात आली.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख
