डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित रुपयाची समस्या या पुस्तकाचे प्रचार प्रसार करणे आप ची मागणी
सन 1921 साली लंडन येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्थिक मुद्द्याबाबत इंग्रज सरकारला रुपयाची समस्या या विषयातील बाबत लिखित 303 पानाचे पुस्तकाच्या माध्यमातून जाब विचारला. त्याकाळी 13 मार्गाने करा मधून सरकारला उत्पन्न मिळत होते. त्या सर्व करांची नावे व उत्पन्नाच्या आकड्यांसह एकत्र प्रबंध लिहून त्यांनी ब्रिटिश सरकारला जाब विचारला. आणि म्हणाले की माझ्या देशातील विकासाच्या कामाकरिता खर्च न करता त्या पैशाचा उपयोग ब्रिटिश सरकार यांच्या देशामधील नागरिकांसाठी करीत आहे. हे मी कधीच सहन करणार नाही.
सदरच्या पुस्तकातला 104 वर्ष होत असून देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊन देखील समाजवाद, मार्क्सवाद, साम्राज्यवाद, हिंदुत्व, प्रांतवाद, दलित-सुवर्ण, हिंदू-मुस्लिम इतर अनेक धर्मांमध्ये व जातींमध्ये जनतेमध्ये द्वेषाचे, तत्त्वाचे राजकारण करून प्रत्येकाने आपापली पोळी भाजून घेतली असून ज्या पैशाला जात नाही, धर्म नाही, अशा अर्थकारणाबाबत चर्चा न केल्यामुळे रक्त, पाणी व हवा जशी शुद्ध असल्याशिवाय आपण जगू शकत नाही. तसेच सध्या लोकशाहीची अवस्था झाली असून काळ्या, व खोट्या व मोठ्या नोटांमुळे देशामधील सर्वसामान्य जनतेची अवस्था गुलामगिरी सारखी झाली असून काळया पैशावर होत नसलेल्या निवडणुका भ्रष्टाचार म्हणजेच देशाला लागलेली कीड आहे.
गरिबातल्या गरीब म्हणजे रस्त्यावरील भिकारी सुद्धा जर सरकारला कर देत असेल व त्या करा मधूनच देशांमधील कोणतेही सरकार खर्च करत असेल तर खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीला झालेला जमा व खर्च हा त्याच्या व्हाट्सअप वरती किंवा ईमेल वरती मिळाला पाहिजे व रुपयाची समस्या या पुस्तकाची चळवळ सर्वसामान्य जनतेमध्ये आर्थिक मूल्यावर चालू झाली पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने या देशांमधील 140 कोटी जनतेला समृद्ध प्रामाणिक आनंददायी व स्वाभिमानाने जीवन जगता येऊ शकेल हीच खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली राहू शकेल. जरी याबाबत चर्चा करण्यासाठी वाचनालय उभी करण्यासाठी यावी. भावी पिढी निर्माण करण्याकरिता या ग्रंथाचा प्रचार प्रसार करण्यात यावा अशी आमची रास्त मागणी आहे.
प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकावर शॉर्ट फिल्म तयार करून फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब या माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात यावी. पुस्तकामधील महत्त्वाचे मुद्दे, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आणि त्याचा आजच्या काळातील संदर्भ यांचा समावेश असावा. विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करून भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासातील या पुस्तकाचे योगदान समजावून सांगण्यात यावे. विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन पुस्तकावर आधारित व्याख्याने व चर्चा आयोजित करण्यात यावी. पुस्तकाच्या भाषांतरित आवृत्ती शाळा, महाविद्यालये, वाचनालये येथे मोफत वाटप करण्यात यावे. स्थानिक वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, सार्वजनिक ठिकाणी पुस्तकाचे महत्त्वा बाबत प्रचार करण्यात यावा. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर वाचन चळवळ सुरू करून या पुस्तका बाबत निबंध स्पर्धा व भाषण सादर करणेस प्रोत्साहन देण्यात यावे. बाबासाहेबांच्या साहित्यावर विशेष ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात यावे.
प्रत्येक उपक्रमात बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्यात यावा व आर्थिक, सामाजिक व राजकीय सुधारणांमध्ये त्यांचे योगदान ठळकपणे मांडण्यात यावे.
याबाबत आम आदमी पक्ष संवेदनशील असून याचा पाठपुरावा करणार आहे. तरी आपणास विनंती करण्यात येत आहे. आम आदमी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय, सचिव श्री प्रभाकर कोंढाळकर यांनी बार्टी महासंचालक सुभाष वारे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
वरील प्रमाणे आम्हाला कार्य अपेक्षित आहे. आम्हाला स्वराज्य नवनिर्मिती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यासारख्या अनेक संस्थांना कळावे. CSR फंडाच्या माध्यमातून प्रयत्न करून त्या त्या संस्थांच्या माध्यमातून संस्था सक्षम करून प्रचार प्रसादाचे काम आर्थिक सक्षम करून काम उभे करावे.
