February 15, 2026

चातुर्मासानिमित्त दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे प्रवचन महोत्सवश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांचे प्रवचन तर, ह.भ.प. डॉ. भावार्थ देखणे महाराज यांचा भारुड कार्यक्रम

0
IMG-20250709-WA0068
Spread the love


पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त प्रवचन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगद्गुरु कृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांची पाच दिवसीय प्रवचनमाला आणि ह.भ.प. डॉ. भावार्थ महाराज देखणे यांचा सुश्राव्य भारुड कार्यक्रम देखील होणार आहे. दि. १४ ते १८ जुलै दररोज सायंकाळी ६ ते ८ यावेळेत प्रवचन आणि दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ यावेळेत भारुड कार्यक्रम होणार आहे. हा महोत्सव टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आला असून सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

ज्ञानोबा तुकोबांचे जीवनविषयक तत्वज्ञान याविषयावरील प्रवचनमालेत श्री क्षेत्र भंडारा डोंगर जगद््गुरुकृपांकित डॉ.चेतनानंद महाराज पुणेकर यांचे दररोज प्रवचन होईल. प्रवचनात स्वधर्म व जीवन ध्येय, कर्म व चरित्र निर्माण, मैत्रबंधुभाव व संगत, सुख, शांती व आनंद, आजचे जग व संतांचे विचार याविषयी चेतनानंद महाराज निरुपण करणार आहेत. यानिमित्ताने विश्वमाऊली ज्ञानोबाराय व जगद्गुरू तुकोबाराय यांचे मानवी जीवन समृद्ध व संपन्न करणारे चरित्र व तत्वज्ञान ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

  • डॉ. भावार्थ महाराज देखणे यांचा भारुड कार्यक्रम शनिवारी (दि. १९)
    भारतीय संस्कृती व पंरपरा संपन्न असून यामध्ये अनेक कला जोपासल्या गेल्या आहेत. त्या लोककलांमधील भारुड ही प्राचीन कला. ह.भ.प.डॉ. भावार्थ महाराज देखणे हे भारुड कार्यक्रमातून हा कलाप्रकार उपस्थितांसमोर उलगडणार आहेत. शनिवार, दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता टिळक स्मारक मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाला प्रवेश खुला असून प्रवचन, भारुड कार्यक्रमाचा पुणेकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी