February 15, 2026

‘शिव-शक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा‌’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शनिवारी

0
IMG-20250617-WA0054
Spread the love

पुणे : संवाद, पुणे आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘शिव-शक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा‌’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शनिवार, दि. 21 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रकाशित आणि प्रा. डॉ. प्रकाश खांडगे संपादित या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, संत साहित्य आणि लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे प्रमुख पाहुणे आहेत. ज्येष्ठ कवयित्री, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती संवाद, पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे, महाराष्ट्र कला संस्कृती मंचच्या शैला खांडगे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
प्रकाशन समारंभानिमित्त ‌‘भक्तिरंग‌’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे (कीर्तन), सत्यपाल महाराज (सप्तखंजिरी भजन), संध्या साकी (भारूड), शाहीर पृथ्वीराज माळी (गोंधळ) यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी