February 15, 2026

पंडित सी. आर. व्यास यांच्या सांगीतिक जीवनावरील‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन‘ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी

0
IMG-20250527-WA0026
Spread the love

पुणे : पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या सांगीतिक जीवनप्रवासावरील ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन‘ या श्रुती पंडित आणि शशी व्यास लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार, दि. २९ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता श्रीराम लागू रंग अवकाश, ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार, हिराबाग चौक, टिळक रोड येथे होणार आहे. ग्रेस फाऊंडेशनची निर्मिती असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पॉप्युलर प्रकाशनतर्फे करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंडित सी. आर. व्यास यांच्या शिष्या अपर्णा केळकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच या चरित्रग्रंथाच्या निमित्ताने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून यात ज्येष्ठ संपादक रामदास भटकळ, लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, पंडित सुहास व्यास तसेच ग्रंथाचे लेखक श्रुती पंडित आणि शशी व्यास यांचा सहभाग असणार आहे.
चिंतामणी रघुनाथ व्यास अर्थात पंडित सी. आर. व्यास म्हणजे अभिजात हिंदुस्थानी रागदारी संगीतविश्वातील एक मोठे नाव. या गानतपस्वीच्या अविरत संगीतसाधनेवर आणि संगीतमय जीवनप्रवासावर ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’ हा चरित्रग्रंथ बेतलेला आहे. सी. आर. व्यास यांचे सुपुत्र आणि पंचम निषाद तसेच ग्रेस फाऊंडेशन या संगीत-संस्थांचे संस्थापक शशी व्यास आणि श्रुती पंडित या दोघांनी मिळून या चरित्रग्रंथाचे लेखन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी