January 19, 2026

वस्ती विभागातील मुलांना खेळाचे साहित्य व गोष्टीची पुस्तकं देऊन भाजपा चे नवनिर्वाचित शहर अध्यक्षांचा आगळावेगळा सत्कार – संदीप खर्डेकर

0
IMG-20250521-WA0027
Spread the love

तुमची क्षमता किती आणि तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर तुमचं प्रावीण्य ठरते – मा.धीरज घाटे

Mआपला जन्म कोणाच्या घरात झाला, आपण कुठल्या भागात राहतो कुठल्या वस्तीत राहतो हे महत्वाचे नाहीये तर तुमची क्षमता किती आणि तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर तुमचं प्रवीण्य ठरते असे भाजपा चे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष धीरज घाटे म्हणाले.छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर किंवा इतर अनेक मंडळींनी बालपणापासूनच कामाला सुरुवात केली आणि त्यांनी देशात, राज्यात मोठं कार्य केलं असं ही ते म्हणाले.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी धीरज घाटे यांची शहर अध्यक्ष पदी फेर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने सत्कार करण्याचे ठरविले. त्यानुसार वारजे येथील छत्रपती शाहू महाराज वसाहत येथे सेवाव्रत फाउंडेशन च्या वतीने चालविल्या जाणाऱ्या “वृंदावन शैक्षणिक व सर्वांगीण विकास प्रकल्पातील” मुलांच्या हस्ते धीरजजींचा सत्कार आणि धीरजजींच्या हस्ते मुलांना खेळाचे साहित्य भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित केला त्यावेळी धीरजजी बोलत होते.
यावेळी प्रकल्प समन्वयक प्रदीप देवकुळे, भाजयुमो क्रीडा आघाडी अध्यक्ष प्रतीक खर्डेकर वस्तीतील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
आम्ही क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देतो आणि म्हणूनच धीरजजींच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्यापेक्षा त्यांच्या हस्ते गरजू मुलांना आवश्यक वस्तू देऊन त्यांचा सन्मान करणे आम्हाला अधिक योग्य वाटले असे भाजप चे प्रदेश प्रवक्ते आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या प्रकल्पाला भेट दिली तेव्हा मुलांनी आम्हाला खेळाचे साहित्य द्या अशी मागणी केली, त्यानुसार धीरजजींच्या हस्ते क्रिकेट बॅट बॉल, बास्केटबॉल, फुटबॉल आणि गोष्टीची पुस्तकं देण्यात आल्याचे संदीप खर्डेकर आणि मंजुश्री खर्डेकर म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सादर केला. तसेच धीरजजींना विविध प्रश्न देखील विचारले.हाच धागा पकडून धीरज घाटे यांनी मुलांशी संवाद साधला आणि ” अनेक मोठ्या कार्यक्रमांना जाण्याचा योग येतो पण हा कार्यक्रम आणि येथे झालेला सत्कार मनाला भावला अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मुलांनी स्वहस्ते बनविलेले ग्रीटिंग कार्ड देऊन धीरजजींना शुभेच्छा दिल्या.
आपला,
संदीप खर्डेकर.
प्रवक्ता, भाजपा महाराष्ट्र.
मो – 9850999995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button