पुणे महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक नेमणूक व त्यांच्या कामाच्या पद्धतीची सविस्तर चौकशी करावी -धीरज घाटे
पुणे ता २३जुलै
प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेमध्ये नेमलेल्या सुरक्षारक्षकांवरून महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्व साधारण सभेमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही प्रशासनाला धारेवर धरले होते याबाबत सुरक्षारक्षकांची नेमणूक व त्यांच्या कामाच्या पद्धतीची सविस्तर चौकशी करण्यासंदर्भात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नगरसेवक धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज महानगरपालिका आयुक्त श्री नवल किशोर राम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले
या निवेदनामध्ये खालील मुद्यावर महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले
१)सुरक्षा पुरविणाऱ्या एजन्सींच्या नोंदी, प्रत्यक्ष कार्यरत सुरक्षा रक्षकांची संख्या आणि महानगरपालिकेकडे असलेल्या नोंदी यांची पडताळणी करावी.
२)सुरक्षा रक्षकांचे वेतन वेळेवर दिले जाते का, एजन्सीकडून पूर्ण वेतन मिळते का, याची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी.
३)महानगरपालिकेत सेवेत असलेल्या सुरक्षा रक्षकाने जर कामात काही कसूर केला तर त्याला संबंधित ठेकेदाराकडे पाठवले जाते किंवा त्याचे काम थांबवले जाते. संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाई करताना कोणतीही अंतर्गत चौकशी केली जात नाही. त्या सुरक्षा रक्षकांचे म्हणणेही ऐकून घेतले जात नाही. एकतर्फी पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केली जाते. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्या जागेवर नवीन सुरक्षा रक्षक नेमले जातात. अधिकाऱ्यांची ही कार्यपद्धती संशयास्पद आहे. काही सुरक्षा रक्षकांना कमी करून तिथे नवीन सुरक्षा रक्षक नेमताना अधिकाऱ्यांकडून आर्थिक व्यवहार होतात, अशाही तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यात यावी आणि अशा पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर गंभीर कारवाई करण्यात यावी.
४. महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून नेमणुकीसंदर्भात लोकप्रतिनिधींकडून शिफारस करण्यात येते. हे जरी खरे असले तरी लोकप्रतिनिधी त्यांच्या प्रभागातील एखाद्या व्यक्तीची शिफारस करतात. त्यामुळे त्या व्यक्तीला आधार मिळतो. याकडे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जाते, अशा तक्रारी आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन नेमणूक केल्यामुळे अनेक बेरोजगार पात्र उमेदवारांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक मिळत नाही. तसेच काही सुरक्षा रक्षकांना चुकीच्या कारणावरून नोकरीवरून कमी केले जात असल्याच्या तक्रारीही आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
पुणे महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीपासून, त्यांच्या कामकाजापर्यंत, सेवा नियमांपासून ते कामावरून कमी करण्यापर्यंत अनेक अनियमितता होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अनियमिततेमुळे काही अधिकारी मनमानी पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी.
या बाबत काही अनियमितता आढळल्यास तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली
या शिष्ट मंडळात शहराध्यक्ष नगरसेवक धीरज घाटे,नगरसेवक रविंद्र साळेगावकर, पुनीत जोशी, राघवेंद्र उर्फ बापू मानकर, पृथ्वीराज दादा सुतार, विश्वास ननावरे, अजय खेडेकर, अतुल तरवडे, अमर आवळे, सुनील पांडे, पूजाताई जागडे, पायलताई तुपे, अर्चनाताई जगताप, नवनाथ जाधव आदींचा समावेश होता
