Oslo: A Tail of Promise या चित्रपटाचा पुण्यात शनिवारी भव्य प्रीमियर पार पडला
गोव्यात गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या International Film Festival of India (IFFI) च्या ५६व्या आवृत्तीत भावनिक प्रतिसाद मिळाल्यानंतर . या सोहळ्यास चित्रपटातील कलाकार आणि तांत्रिक टीम उपस्थित होती. चित्रपटाचे सादरकर्ते आणि निर्माता John Abraham यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून या क्षणाची शोभा वाढवली.
खऱ्या आयुष्यावर आणि वास्तव अनुभवांवर आधारित Oslo: A Tail of Promise हा एक वारसा जपणारा नॉन-फिक्शन चित्रपट आहे — दोन जीव कसे भेटतात, एकमेकांवर परिणाम करतात, जखमा भरून काढतात आणि शेवटी एकमेकांना घडवतात याची ही सिनेमॅटिक कहाणी आहे. जखमी भूतकाळ असलेला सायबेरियन हस्की ‘ओस्लो’ जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत असलेल्या पूजाला भेटतो, तेव्हा प्रेम, जिद्द आणि परस्पर उपचारांची एक विलक्षण सफर सुरू होते. हा चित्रपट माणसाला प्राणी आणि निसर्ग देत असलेल्या शाश्वत देणग्यांचा गौरव करतो.
John Abraham प्रस्तुत आणि निर्मित या चित्रपटात ओस्लो आणि Protecterra Ecological Foundation च्या संस्थापिका Pooja R Bhale यांच्यातील अतूट नातं प्रभावीपणे उलगडतं. ही कथा सहअस्तित्वाचं एक अंतरंग चित्र रेखाटते — जिथे सोबत आणि प्रेम प्रजातींच्या सीमांनाही ओलांडून जातं.
निर्माते John Abraham म्हणतात, “हा चित्रपट आपल्याला आठवण करून देतो की प्राणी आपली सेवा करण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी नाहीत, तर आपल्याला शिकवण्यासाठी आहेत. ओस्लोला फक्त पूजामध्ये घर सापडत नाही; तो तिच्या अंतःकरणातही तिला एक घर देतो. अशा कथा सांगितल्या गेल्याच पाहिजेत, कारण करुणा ही निवड नसून आपली जबाबदारी आहे.”
या चित्रपटाच्या मध्यभागी आहे — एका कुत्र्याचा आणि त्याच्या मुलीचा प्रवास. Pooja R Bhale या स्वतःचं जग स्वतः उभं करणाऱ्या स्त्री आहेत. त्या तंबूमध्ये घर बनवतात, प्राण्यांनी वेढलेलं आयुष्य जगतात आणि समाजाने आखून दिलेल्या चौकटींपलीकडे जाऊन धैर्याने प्रेमाची निवड करतात. त्यांच्या प्रवासातून चित्रपट शांत पण प्रभावीपणे अनेक ठोकताळे मोडून काढतो.
Vaanar Nirmit चे निर्माता Amey Gosavi म्हणतात, “बहुतेक कथांमध्ये कुत्रे हे पुरुषत्व, साहस आणि तरुण जोशाचे प्रतीक म्हणून दाखवले जातात. Oslo – A Tail of Promise ही संकल्पना पूर्णपणे उलटी करते. एक स्त्री त्या जागेत कशी उभी राहते हे हा चित्रपट दाखवतो. ओस्लोच्या नजरेतून आपण पूजाचा तो पैलू पाहतो, जो समाज अनेकदा पाहण्यात अपयशी ठरतो.”
दिग्दर्शिका Isha Pungaliya यांनी चित्रपट वास्तवाशी प्रामाणिक ठेवत अनावश्यक नाट्य टाळलं आहे आणि भावनिक सत्याला प्राधान्य दिलं आहे. त्या म्हणतात, “मला कुत्र्यावर किंवा एखाद्या स्त्रीवर चित्रपट बनवायचा नव्हता. मला निसर्गाशी आणि भाषेपलीकडील नात्यांशी संवाद साधणारा चित्रपट बनवायचा होता. ओस्लो आणि पूजाचं नातं पवित्र वाटलं, आणि माझं काम फक्त त्याचा सन्मान करणं होतं.”
Oslo: A Tail of Promise या चित्रपटाचे दिग्दर्शन Isha Pungaliya यांनी केले असून तो John Abraham यांनी प्रस्तुत केला आहे. हा चित्रपट JA Entertainment, Protecterra Ecological Foundation आणि Vaanar Nirmit यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित झाला आहे.
