कर्वेनगर स्मशानभूमी तील दुरावस्थेबाबत.
एका अंत्यविधी साठी कर्वेनगर स्मशानभूमीत गेलो असता तेथे अत्यन्त वाईट परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले. तेथे खोदकाम केलेले असून स्मशानात जाण्याचा रस्ता धोकादायक व अरुंद झालाय व पार्किंग ची देखील योग्य व्यवस्था नाही.तेथील कलवर्ट चे काम कुर्मगतीने सुरु असल्यामुळे ही अडचण असून तेथील प्रलंबित कामं त्वरित पूर्ण करावीत अशी मागणी करत आहे.
तसेच वरील छायाचित्रात दर्शविल्याप्रमाणे तेथे विद्युत दाहिनीचे अर्धवट झालेले काम दिसून येते व सर्वत्र त्याचे सामान पडले असून अस्वच्छता देखील झाली आहे.सदर काम केले जाणार आहे काय ? हे काम पूर्ण करण्यात काही अडचणी आहेत काय ? याचा खुलासा होणे गरजेचं आहे.
तरी आपण याबाबत त्वरित खुलासा करावा आणि येथील काम कधी पूर्ण होईल किंवा कसं याबाबत ची माहिती जाहीर करावी अशी आग्रही मागणी करत आहे.तेथेच नव्हे तर बदलत्या काळानुसार सर्वच ठिकाणी विद्युतदाहिनी व्हावी आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने अधिकाधिक नागरिकांनी अंत्येष्टी साठी त्याचा वापर करावा असे जनजागृती फलक ही सर्वत्र लावावेत ही विनंती.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष,
क्रिएटिव्ह फाउंडेशन. पुणे.
मो – 9850999995
