February 15, 2026

जनवाडी यंग सर्कल ट्रस्ट चा सर्वांनी आदर्श घ्यावा असा उपक्रम!

0
IMG-20250910-WA0056
Spread the love


पुण्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या जनवाडी यंग सर्कल तर्फे इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त साऊंड डीजे वगैरेचा खर्च टाळत परिसरातील गरजू व कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, व आरोग्यासाठी तातडीची मदतीसाठी युवकांनी वर्गणी काढून ॲम्बुलन्स विकत घेतली, विशेष म्हणजे परिसरातील व सर्व नागरिकांना ही ॲम्बुलन्स सेवा पूर्णपणे मोफत मिळणार आहे,अशा प्रकारे कुठलाही डीजे न लावता कुठलाही गाजावाजा न करता अशा प्रकारे एक सामाजिक उपक्रम घेऊन सर्वसामान्य माणसांना याचा लाभ पोहोचणार आहे व सामान्य माणसाला मोफत ही सुविधा मिळणार आहे अशा उपक्रमाचे कौतुक समाजातील सर्व स्तरातील नागरिक यांनी केलं तसेच जे मंडळ संस्था डीजे किंवा इतर गोष्टी वरती पैशांची उद्यापट्टी केली जाते व अनावश्यक खर्च केला जातो त्याऐवजी या सदर मंडळांनी जो आदर्श घालून दिलेला आहे त्याचा अनुकरण केलं तर त्याचा लाभ सर्व घटकांना पोहोचून निश्चितच नवी क्रांती घडेल, व असं इतर मंडळ यांनीही करावं यासाठी असा आदर्श उपक्रम केल्याबद्दल त्याला शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील सर्व पक्षीय पदाधिकारी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित राहून आयोजकांना शुभेच्छा दिल्या सदर मोफत ऍम्ब्युलन्स सेवेचे आयोजन वसीम शेख, इर्शाद खान,तालीब शेख ताजू पटेल अजीम शेख निसार शेख अरबाज मुल्ला, शाहरुख शेख,आदींनी केले
यावेळेस सर्वपक्षीय मान्यवर माजी स्थायी समिती अध्यक्ष व सभागृहनेते एडवोकेट निलेश निकम माजी नगरसेवक आदित्य माळवे,प्रदीप देशमुख,इकबाल शेख,योगेश बाचल, उमेश वाघ,किरण बोरसे,संजय मोतलिंग, प्रवीण डोंगरे दत्ता जाधव, रशीद शेख, अस्लम मिरजकर,जहीर शेख, अमजद खान, मोहम्मद बागवान,फारूक सौदागर,सलीम मुल्ला,रियाज पिरजादे,समद शेख,आदी मान्यवर उपस्थित होते त्रिमूर्ती मित्र मंडळ अखिल जनवाडी मित्र मंडळ इत्यादींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळेस सूत्रसंचालन अल्ताफ पिरजादे यांनी केले तसेच प्रास्ताविक युसुफ शेख यांनी मांडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी