उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंची युती मुंबई महापालिकेत फुसका बार ठरेल ~ केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.20 ~ उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या एकजुटी चा राज्यात राजकीय करिष्मा होईल अशी अपेक्षा फोल ठरली आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत राज आणि उद्धव यांच्या युतीचा दारुण पराभव झाला आहे.शरद राव यांच्या युनियन च्या पॅनल चा विजय झाला आहे.बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल हा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट ठरला आहे.त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुती चा विजय होणार असून ठाकरे बंधूंच्या युतीचा बार फुसका ठरणार आहे अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिली आहे. मुंबईत बेस्ट पतपेढी च्या निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे यांच्या पॅनल चा दारुण पराभव झाला आहे.त्यावर प्रसिद्धीमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ना.रामदास आठवले यांनी ठाकरे बंधूंच्या युतीचा करिष्मा राज्याच्या राजकारणात चालणार नसल्याचे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेतल्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे यांचेच मोठे नुकसान होणार आहे.उद्धव ठाकरे यांना राज यांच्या सोबत च्या युतीचा कोणताही राजकीय फायदा मिळणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीचा कोणताही प्रभाव पडणार नाही असे ना.रामदास आठवले यांनी मत व्यक्त केले आहे.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख
