August 27, 2025

पुण्यामध्ये एडीपी इंडियाने २६वा वर्धापन दिन साजरा केला

0
IMG-20250815-WA0043
Spread the love

~ पुण्यामध्ये १,३०० पेक्षा अधिक सहयोगी प्रतिभा आणि सांघिक भावनेचा उत्साही प्रदर्शनासाठी एकत्र आले ~

पुणे,११ ऑगस्ट २०२५ -एडीपी इंडिया, भारतातील मानव संसाधन व्यवस्थापन सॉफ़्टवेअर आणि सेवा प्रदान करणारी एक अग्रगण्य कंपनीने पुण्यातील जेडबल्यू मॅरियेटमध्ये कंपनीचा २६वा वर्धापन दिन अतीशय उत्साहात आणि दिमाखात साजरा केला. इतक्या वर्षांचा यशस्वीतेचा स्मर्णार्थ आयोजित केलेल्या या कार्यक्रमात १,३०० पेक्षा अधिक एडीपी सहयोगी तर उपस्थित होतेच, पण त्यांना साथ देण्याकरिता जागतिक पटलावरील एडीपी कार्यालयांमधून स्मार्ट कंप्लायान्स सोल्युशन्स ॲन्ड ह्युमन रिसोर्स आऊटसोर्सिंगचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. ब्रायन मिशल आणि एडीपी टोटल सोर्स®️ चे वरीष्ठ उपाध्य्क्ष आणि महाव्यवस्थापक श्री. मौहोम्मद फ़हमी देखील उपस्थित होते.

या आनंदाचा क्षणांचे साजरीकरण करताना एडीपीने “थिंक बियॉन्ड फ़ॉर द न्यु एरा” या थीमवर आधारीत विविध सांस्कृतिक आणि मनाला खिळवून ठेवणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले होते, ज्यात नाट्य प्रदर्शन, पारंपारिक महाराष्ट्रीय ढोल ताशा आणि संगीत कलेचा देखील समावेश करण्यात आला होता. विविध नृत्याविष्कार आणि मनोरंजक कार्यक्रमांनी प्रेक्षक वर्ग अगदी मंत्रमुग्ध झाला.

आपल्या क्षमता आणखीन वाढवत सर्वोत्तम प्रतिभेमध्ये गुंतवणूक करून, एडीपी जगातील व्यवसायांवर प्रभाव पाडणाऱ्या भारतातील उपाययोजना प्रदान करण्यावर भर देणार आहे. मागील 26 वर्षात एडीपी भारतात १०२ सहयोगींपासून १३,००० सहयोगींपर्यंत पोहोचली आहे. हा विकास कंपनीची भारतासारख्या तंत्रज्ञान आणि कल्पकतेचा हब प्रती असलेली बांधिलकी दर्शविणारा आहे.

एडीपी प्रायवेट लिमिटेडचे व्यवस्थापकिय संचालक आणि महाव्यवस्थापक असलेले श्री. विजय वेमुलपल्ली म्हणाले, “ एडीपी इंडियाची २६ वर्षे साजरी करणे हा आपल्या सगळ्यांकरिता एक मैलाचा दगड आहे. या प्रवासाची ओळख ही बांधिलकी, कल्पकता आणि आपल्या सहयोगींशी असलेल्या नात्याने – आपल्या एडीपीचा मैत्री भावाने होते. सहयोगींनी नेहमीच तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रांमधे एक महत्वाची भूमिका पार पाडली आहे. हे साजरीकरण आपल्या संस्कृती, आपल्या लोकांचे आणि आपण जपलेल्या मूल्यांचे एक प्रतिबिंब आहे. यावर्षी आपले सजरीकरण हे “थिंक बियॉन्ड” या थीमवर आधारीत असून आपण फ़क्त गेलेल्या यशस्वी वर्षांचीच आठवण काढणार नसून पुढे काय शक्य आहे याचा देखील विचार करणार आहोत. आपला प्रवास हा असाच कल्पकतेवर आणि उत्तम उपाययोजना प्रदान करण्यावर आधारीत असावा ज्यामुळे आपल्या क्लाएन्ट्सला आणि समाजाला पुढे जात राहण्याची ऊर्जा मिळत राहील. आम्ही एका समावेशक भविष्यासाठी उत्तम कार्यस्थळ निर्माणकरण्यास बांधिल असू जे आत्तापर्यंतचा कार्यस्थळांपेक्षा अधिक मजबूत असेल. पुढील प्रवास हा अधिक आकर्षक असेल आणि म्हणून आम्ही “थिंक बियॉन्ड फ़ॉर द न्यु एरा”करिता तयार आहोत. “

एडीपी स्टुडीयो या कंपनीच्या आंतरिक संगीत समूहाने ठेका धरायला लावणाऱ्या संगीताने कार्यक्रमाची रात्र ही मंत्रमुग्ध बनविली. एडीपीच्या नाट्य समूहाने देशप्रेम आणि भारतातील महिलांची भारतीय सैन्यात सामिल होऊने देश सेवा प्रदान करणाच्या मानसिकतेवर आधारीत नाट्याचे सादरीकरण केले. त्यानंतर एडीपीचा नृत्य समूहाने एक भन्नाट आणि जोश पूर्ण असा भविष्यातील नृत्याविष्कार सादर करताना कल्पकता आणि सामूहिक कार्यावरती भर दिला.

संध्याकाळी पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये, सहयोगींनी आणि व्यवसायातील विविध समूहांनी केलेल्या विशेष कामगिरीची दखल घेण्याकरिता ज्याचे आयोजन केले गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button