लंडन मधील भारतीय उच्च आयुक्तालयाच्या प्रांगणात 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यात आला

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून लंडन मधील भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळ्यास उपस्थित राहिले.यावेळी ना. रामदास आठवले यांच्या हस्ते जलतरणपटू अनन्या प्रसाद या मुलीचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या सोहळ्यास लंडन मधील शेकडो भारतीय उपस्थित होते.भारतातून ना. रामदास आठवले यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले; रिपाइं चे अविनाश कांबळे; सौ माधुरी अविनाश कांबळे; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे चंद्रशेखर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.