डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे भारतीय स्वातंत्र्य; एकात्मता अखंड ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

लंडन/ मुंबई दिनांक 14 ~ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे भारत देश एकसंघ आहे.राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्य अखंड आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज केले.देशवासीयांना 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लंडन मधील हेन्री रोडवरील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय स्मारकाला आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी भेट देऊन येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले.यावेळी ना.रामदास आठवले यांच्या समवेत सौ सीमाताई आठवले; रिपाइं चे महाराष्ट्र उपाध्यक्ष अविनाश कांबळे; सौ माधुरी अविनाश कांबळे; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे उपस्थित होते.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आमचे सर्वोच्च प्रेरणास्थान आहेत. त्यांच्यामुळेच माझ्या सारख्या कार्यकर्त्याला केंद्रीय मंत्रिमंडळात पोहोचण्याची संधी मिळाली. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या संघर्षामुळे त्यांनी केलेल्या क्रांतीमुळे त्यांनी दिलेल्या संविधामुळे देशभरातील दलित गरीब बहुजन वर्गाला सामाजिक आर्थिक शैक्षणिक न्याय मिळाला.असे ना. रामदास आठवले म्हणाले.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर लंडनमधील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेत असताना ते लंडन मधील हेन्री रोडवर रहात असत.त्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2014 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संग्रहालय रुपी स्मारक उभारले.त्याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.त्या उद्घाटन सोहळ्यास मी सुद्धा उपस्थित राहिलो होतो याची आठवण ना.रामदास आठवले यांनी सांगितली.लंडन मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक दोन मजली आहे.त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक दुर्मिळ फोटो आणि बुद्धमूर्ती या स्मारका मध्ये आहेत. इंग्लंड मधील अनेक लोक तसेच भारतीय पर्यटक या स्मारकाला नेहमी भेट देत असतात अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.
ना.रामदास आठवले लंडन दौऱ्यावर असून उद्या 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिना चा सोहळा लंडनमधील इंडियन हाय कमिशन च्या कार्यालयात साजरा होणार असून त्यात ना.रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.ना.रामदास आठवले यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त इंडियन हाय कमिशन च्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात येणार आहे.या दौऱ्यात ना.रामदास आठवले यांच्या समवेत सौ सीमाताई आठवले; अविनाश कांबळे; सौ माधुरी कांबळे; चंद्रशेखर कांबळे हे सोबत आहेत.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख