July 4, 2025

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत राजमातेची भूमिका साकारताना आपल्या प्रत्यक्ष आणि पडद्यावरील जीवनातील साम्य-भेद सांगताना पद्मिनी कोल्हापुरे म्हणते, “माझा मुलगा आता मोठा झाला असला तरी माझ्यातली मातृत्व भावना कधीच फिकट झाली नाही”

0
IMG-20250702-WA0056
Spread the love

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या ऐतिहासिक मालिकेतील एक महान बाल राजा घडवण्याच्या कहाणीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेधक कथानक, निर्मितीतील भव्यता आणि उत्कृष्ट व्यक्तिचित्रण करणारी ही मालिका पृथ्वीराज चौहान या महान भारतीय सम्राटाची कथा सांगते आणि त्याच्या प्रारंभिक जडणघडणीच्या काळात त्याच्या जीवनाला आकार देणाऱ्या खंबीर महिलांवर देखील प्रकाश टाकते. त्यांच्यापैकी एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे राजमातेचे! ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेने ही भूमिका साकारली आहे. तिची ताकद, डौल आणि तिने केलेले मार्गदर्शन या युवा राजाच्या जडणघडणीत फार मोलाचे होते.
उत्कृष्ट आणि अष्टपैलू अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेने राजमातेची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत केली आहे. केवळ एक अभिनेत्री म्हणून नाही, तर एक माता म्हणून देखील. घरातील ज्येष्ठ स्त्रीची भूमिका करणे हा तिच्यासाठी एक अत्यंत खाजगी अनुभव ठरला आहे. ही भूमिका करत असताना तिला आपल्या स्वतःच्या मातृत्वाच्या प्रवासाची आठवण आल्याखेरीज राहात नाही. कणखर ताकद, मौन बलिदान आणि संरक्षक स्वभाव राजमातेच्या व्यक्तिरेखेतून दाखवत असताना पद्मिनी अत्यंत भावुक मातृत्वाचे क्षण स्वतः अनुभवते. पडद्यावर राजमातेचे राजाशी जे संबंध आहेत ते तिला आपल्या स्वतःच्या मुलाशी असलेल्या नात्यात दिसतात. आणि तिला या गोष्टीची जाणीव होते की, राजेशाही असो किंवा सर्वसामान्य, मातृत्व हे नेहमी निरपेक्ष प्रेम आणि मौन लवचिकतेच्या स्तंभांवर उभे असते.
आपला अनुभव व्यक्त करताना पद्मिनी कोल्हापुरे म्हणते, “राजमाता साकारणे हा माझ्यासाठी एक अत्यंत भावनिक समृद्धी देणारा अनुभव ठरला आहे. एक आई, जी राणी देखील आहे, तिच्यात अत्यंत सामर्थ्यशाली असे काहीतरी असते. तिला आपला राजमुकुट आणि आलिंगनातील ऊब यांच्यातील समतोल साधावा लागतो. पडद्यावर राजमाता साकारत असताना मी स्वतःच्या मातृत्वाशी त्याचे साम्य शोधत असते. आपल्या अपत्याचे संरक्षण करण्याची भावना, आत्यंतिक प्रेम, बलिदान यांचा विचार करता करता तुम्हाला जाणवते की या भावना किती सार्वत्रिक आहेत. माझा मुलगा आता मोठा झाला असला तरी, माझ्यातली मातृत्व भावना कधीच फिकट झाली नाही. त्यात थोडा थोडा बदल मात्र होतो. ही भूमिका करताना मला मातृत्वाचे प्रारंभिक दिवस आठवले- शिकवण्याचे, सांगोपनाचे, कधीकधी काळजीचे आणि सदैव प्रेमाचे! ही भूमिका मला माझ्या स्वतःच्या प्रवासाच्या जवळ घेऊन गेली आहे, जे मी अपेक्षिले नव्हते. राजमातेची ताकद तिच्या मृदूपणात आहे आणि मला वाटते प्रत्येक मातृत्व असेच असते.”

ही भव्य कथा उलगडताना बघा, दर सोमवार ते शुक्रवार रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button