सामाजिक कार्यकर्ते रामदास मारणे यांना ‘विद्यावाचस्पती सन्मान’ प्रदानअयोध्येतील दीक्षांत समारंभात सामाजिक सेवेबद्दल सन्मान

पुणे : सामाजिक कार्यकर्ते रामदास मारणे यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘विद्यावाचस्पती सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ यांच्या वतीने हॉटेल रेडिसन पार्क इन, अयोध्या धाम येथे आयोजित राष्ट्रीय संगोष्ठी आणि दीक्षांत समारंभ प्रसंगी प्रदान करण्यात आला.
या विशेष प्रसंगी पद्मश्री डॉ. अरविंद कुमार, माजी कुलगुरू, राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ, झांसी यांच्या हस्ते रामदास मारणे यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. इंद्रभूषण मिश्रा, कुलगुरू, पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ तसेच वृंदावन धाम, मथुरा येथील प्रसिद्ध कथावाचिका दीपा मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
रामदास मारणे हे “युवा भारती” या युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच ते ग्रीनगाई पर्यावरण व शाश्वत विकास फाउंडेशन या पर्यावरण शिक्षण व शाश्वत विकासासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत. यावेळी पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारसरणीवर आधारित सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकास यावर सखोल चर्चा झाली.