April 13, 2026

चितळे बंधू मिठाईवालेकडून ‘रांजे व्हिजन पार्क’ची निर्मितीमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी होणार उद्घाटनपुणे, ता. १३ बाकरवडीमुळे जगभरात लोकप्रियता मिळवलेल्या ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांच्यावतीने भोर तालुक्यातील रांजे येथे ‘रांजे व्हिजन पार्क’ या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १६) होणार आहे.

0
IMG-20260413-WA0046
Spread the love

सुमारे २५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या या पार्कमध्ये मिठाई आणि नमकीनसाठी दोन स्वतंत्र उत्पादन केंद्रांची उभारणी करण्यात आली असून ते कार्यन्वित देखील करण्यात आले आहेत. या उत्पादन केंद्रात दररोज ४० टन मिठाई आणि नमकीनचे उत्पादन घेता येणार आहे, अशी माहिती चितळे बंधू मिठाईवाले या संस्थेचे भागीदार व चितळे कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे इंद्रनील चितळे व केदार चितळे यांनी सोमवारी (ता. १३) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पार्क देशातील तसेच परदेशांतील बाजारपेठांमध्ये आमच्या विस्तार योजनेसाठी आवश्यक असलेल्या उत्पादनाच्या गरजा पूर्ण करेल. पॅक बंद खाद्यपदार्थांच्या क्षेत्रातील जागतिक मानके लक्षात घेऊनच या प्रकल्पाची रचना आणि उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाला एफएसएससी २२००० हे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असलेले आणि ग्लोबल फूड सेफ्टी इनिशिएटिव्ह मानकांवर आधारित अन्न सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे, असे इंद्रनील चितळे यांनी सांगितले.

केदार चितळे म्हणाले, ‘‘हा पार्कचे ग्राहकांना पाहण्यासाठी खुले असेल. एक्सपीरियन्स सेंटर सारख्या संकल्पनेवर आधारित असलेल्या या पार्कमध्ये ग्राहकांना चितळे बंधू मिठाईवाले यांच्या सर्व उत्पादनांना एकाच ठिकाणी बघता येईल, त्यांची चव घेता येईल. याबरोबरच या ठिकाणी चितळे बंधू मिठाईवाले यांचा आजवरचा प्रवास दर्शवण्यासाठी तयार करण्यात आलेली १०० मीटर लांबीची विशेष भिंत ग्राहकांसाठी नक्कीच कुतूहलाचा विषय ठरेल.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी