‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2026’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादएकाच छताखाली परदेशी शिक्षणाच्या संधींची सविस्तर माहिती
पुणे : परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने आयोजित ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2026’ला पुण्यातील बोट क्लब येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या फेअरमध्ये यूके, यूएसए, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि दुबई येथील सुमारे ५० हून अधिक नामांकित विद्यापीठांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परदेशी शिक्षणासंदर्भातील विविध पर्यायांची माहिती घेतली. विशेष म्हणजे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि पालकांना पूर्णपणे मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले.
परदेशात शिक्षण घेण्याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात—योग्य देश व विद्यापीठाची निवड, शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया, उपलब्ध शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) तसेच प्रवेश प्रक्रिया यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन या फेअरमध्ये करण्यात आले. त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान झाले.
‘स्टडी स्मार्ट’चे संचालक चेतन जैन यांनी सांगितले की, या फेअरमुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील जागतिक शिक्षणाच्या संधींबाबत स्पष्ट दिशा मिळाली. यंदाच्या फेअरमध्ये ६०० हून अधिक विद्यार्थी आणि ९०० हून अधिक पालकांनी सहभाग घेत मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. तसेच आतापर्यंत १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून परदेशातील विद्यापीठांची निवड केल्याची माहिती त्यांनी दिली.
