April 10, 2026

महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षात त्यांचे साहित्य प्रकाशित करा : उपमहापौर परशुराम वाडेकर यांची मागणी

0
IMG-20260410-WA0022
Spread the love

पुणे : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त देशभर व राज्यभर विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. मात्र, या महत्त्वाच्या वर्षातही महात्मा फुले यांचे समग्र साहित्य शासनाच्या वतीने प्रकाशित झाले नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत तीव्र खंत व्यक्त करत पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

उद्या महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शासकीय फोटो झिंको तसेच संबंधित शासकीय विभागांकडून महात्मा फुले यांच्या साहित्याची मागणी करण्यात आली असता, असे कोणतेही साहित्य उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे संताप व्यक्त करत वाडेकर यांनी संबंधित विभागाने तातडीने महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय तसेच त्यांच्याशी संबंधित सर्व साहित्य प्रकाशित करावे, अशी मागणी केली आहे.

तसेच, राज्य शासनाच्या प्रकाशन विभागाचे प्रमुख या नात्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून सर्व साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी