April 6, 2026

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज घेणार राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

मुंबई दि. 05 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची तिस-यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेली आहे. उद्या सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या तिस-या टर्मच्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातुन राज्यसभेवर 7 खासदार बिनविरोध निवडुन गेलेले आहेत. त्यात ना. रामदास आठवले यांचा समावेश आहे. राज्यसभेवर सलग तिस-यांदा बिनविरोध निवड होवून ना. रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार म्हणून हॅट्रीक केलेली आहे. आपल्या राज्यसभेच्या तिस-या टर्मची सुरुवात ना. रामदास आठवले उद्या दिनांक 6 एप्रिल2026 पासुन करणार आहे.

ना. रामदास आठवले यांची एप्रिल 2014 ला सर्वप्रथम राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. त्यानंतर एप्रिल 2020 मध्ये दुस-यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. एप्रिल 2020 ते 2 एप्रिल 2026 पर्यंत त्यांच्या दुस-या टर्मची मुदत होती. उद्या दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत ना. रामदास आठवले आपल्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर दिनांक 6 एप्रिल 2026 पासुन राज्यसभेच्या त्यांच्या तिस-या टर्मला सुरुवात होणार आहे. दिनांक 6 एप्रिल 2026 ते एप्रिल 2032 पर्यत ना.रामदास आठवले यांची राज्यसभेत तिसरी टर्म राहणार आहे. तिस-यांदा राज्यसभेत निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे देशभरातील दलित, बहुजनांनी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन केले आहे. देशभर ना. रामदास आठवले यांचे सत्कार आणि स्वागत होत आहे. नारामदास आठवले यांना तिस-यांदा राज्यसभेवर निवडुन दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यभरातील आंबेडकरी रिपब्लकन जनतेतर्फे हार्दिक आभार मानले जात आहे.

आपल्या तिस-या राज्यसभा सदस्यत्वाची ना. रामदास आठवले उद्या सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत शपथ घेणार आहेत. त्यांना देशभरातील आंबेडकरी जनतेने शुभेच्छा दिलेल्या आहेत.

हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी