April 1, 2026

-जाधवर राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेत शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज विजेतेजाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, पुणे यांच्या वतीने आयोजित दुसरी राष्ट्रीय स्तरावरील ‘जाधवर मूट कोर्ट स्पर्धा ; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांची उपस्थिती

0
IMG-20260401-WA0016
Spread the love

पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, पुणे यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘जाधवर मूट कोर्ट स्पर्धेत एम.एम.एम.शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, पुणे यांनी विजेतेपद पटकावले, तर एनबीटी लॉ कॉलेज, नाशिक यांनी उपविजेतेपद मिळवले. रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ, भोपाळ यांना सर्वोत्कृष्ट मेमोरियलचा पुरस्कार मिळाला.

स्पर्धेचा समारोप नऱ्हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलात उत्साहात पार पडला. अॅड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर लॉ कॉलेज आणि जाधवर लॉ कॉलेज यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेच्या समारोप समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान प्रमुख पाहुणे, तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक, पुणे येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन, कौटुंबिक न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश श्याम नागनाथराव रुकमे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते.

देश्ना जैन (शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, पुणे) यांना अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट वक्ता, विधी लुणावत यांना सर्वोत्कृष्ट संशोधक, तर रेहाना इक्बाल इमानी यांना प्राथमिक फेरीतील सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून गौरविण्यात आले. यावेळी “जीवन गौरव पुरस्कार” देऊन ज्येष्ठ विधीज्ञ सुधाकर आव्हाड यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धेत देशभरातील २८ संघांनी सहभाग घेतला असून ७० हून अधिक विधिज्ञांनी परीक्षक म्हणून काम पाहिल्याने ही स्पर्धा शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी ठरली. अॅड. शार्दुल एस. जाधवर लिखित पुस्तकाचे प्रकाशन व वन मंथ कोर्स सर्टिफिकेट चे प्रकाशन देखील यावेळी झाले.

न्यायमूर्ती उज्जल भुयान म्हणाले, मूट कोर्टमधून प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजाकडे होणाऱ्या संक्रमणासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला तयार ठेवणे आवश्यक आहे. वकिली हा प्रतिष्ठेचा व्यवसाय असून त्यासाठी स्पष्टता, नैतिकता, शिस्त आणि सातत्याने शिकण्याची वृत्ती महत्त्वाची आहे. कायदा हा आयुष्यभर शिकण्याचा प्रवास आहे आणि प्रत्येक प्रकरणातून नवी शिकवण मिळते. न्यायालयात ठामपणे लढावे, मात्र न्यायालयाबाहेर परस्पर आदर राखणे हीच खरी व्यावसायिकता आहे. तसेच समानता ही संविधानाची मूलभूत संकल्पना असून प्रत्येकाला सन्मानाने वागण्याचा अधिकार आहे.

न्यायमूर्ती श्रीराम मोडक म्हणाले, विद्यार्थ्यांनी न्यायालयीन शिस्त, अचूक युक्तिवाद आणि व्यावहारिक ज्ञान यांना प्राधान्य द्यावे. वकिलीतील यश हे केवळ ज्ञानावर अवलंबून नसून प्रभावी सादरीकरण, सखोल तयारी आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांवरही तितकेच अवलंबून असते.

प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन म्हणाले, मजबूत कायदेशीर पाया आणि प्रक्रियेचे सखोल ज्ञान अत्यावश्यक आहे. कुटुंब न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश श्याम रुकमे म्हणाले, न्यायदान करताना संयम आणि सहानुभूती यांना विशेष महत्त्व आहे, असेही त्यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-उपकुलगुरू डॉ. पराग काळकर म्हणाले, अशा स्पर्धांमुळे सक्षम व आत्मविश्वासू विधिज्ञ घडतात.

अॅड. शार्दुल एस. जाधवर म्हणाले, मूट कोर्ट स्पर्धा या शैक्षणिक अभ्यास आणि प्रत्यक्ष न्यायालयीन सराव यांमधील महत्त्वाचा दुवा आहेत. अशा व्यासपीठांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि वकिली कौशल्ये विकसित होण्यास मोठी मदत होते, असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. सपना देव यांनी केले.

  • फोटो ओळ : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, पुणे यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘जाधवर मूट कोर्ट स्पर्धेत एम.एम.एम. शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, पुणे यांनी विजेतेपद पटकावले. यावेळी “जीवन गौरव पुरस्कार” देऊन ज्येष्ठ विधीज्ञ सुधाकर आव्हाड यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी