March 24, 2026

शिवशंभू गाथा” कार्यक्रमाने शिवरायांच्या शौर्याला उजाळा — लोक कल्याण विकास मंच ट्रस्टचा १० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0
IMG-20260321-WA0010
Spread the love


पुणे, दि. १८ मार्च २०२६ :
लोक कल्याण विकास मंच ट्रस्टच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुण्यात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित कथा व गाण्यांचा “शिवशंभू गाथा” हा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन श्री सुरज मामा घोरपडे यांनी केले होते.
कार्यक्रमाला ज्येष्ठ इतिहासकार मा. श्री पांडुरंग बलकवडे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ट्रस्टतर्फे पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
यामध्ये दर्पणकार बालशास्त्री जांभेकर पुरस्कार २०२६ रवी कोपनर, द्रोणाचार्य पुरस्कार २०२६ श्री योगेश येलारपुरकर, समाजरत्न पुरस्कार २०२६ मा. श्री नमेश शेठ बाबर, महाराष्ट्र हॉटेल सम्राट २०२६ हॉटेल शौर्यवाडा (श्री विकास नाना हांडे), युवा उद्योजक पुरस्कार २०२६ श्री यशवंत हरेर, युवा रत्न पुरस्कार श्री समीर वासवंड व श्री अमर पवार, शिवभूषण पुरस्कार श्री संतोष साठे, शिक्षण तज्ञ पुरस्कार श्री शिवाजी शिंदे सर तसेच नृत्यांगना भूषण पुरस्कार मयुरी उत्तेकर यांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि उत्कृष्ट नियोजनासह पार पडला. यावेळी अनेक समाजसेवक, मान्यवर आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ट्रस्टचे प्रशांत थेऊरकर, साहील तोंडे, संजय काकडे, दिनेश गंगावणे व किरण घोरपडे आदी सदस्यही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी