March 23, 2026

-कुणाल गांजावाला यांनी पुणेकरांना दिली सुरेल गीतांची पर्वणी

0
IMG-20260323-WA0040
Spread the love

संगीत महोत्सव : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे

पुणे : तेरे मन में शिवा, मेरे मन मे शिवा, सासो मे शिवा… वाऱ्यावरती गंध पसरला, नाते मनाचे.. तू हे आसमा, मे तेरी ये जमी है…दिल चाहता है… इलाही मेरा… लाडाची ग प्रेमाची ग अशी गाजलेली मराठी आणि हिंदी चित्रपटातील गीते सादर करून गायक कुणाल गांजावाला यांनी सुरेल गीतांची पर्वणी पुणेकरांना दिली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे गणपती मंदिराच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कुणाल गांजावाला लाईव्ह इन कॉन्सर्ट मध्ये कलाकारांनी सादरीकरण केले. यापूर्वी खंडेराव मुळे आणि सहका-यांचा स्वरायात्रा हा सांगीतिक कार्यक्रम देखील झाला.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘दिवस तुझे हे फुलायचे’ या जुन्या गीताला नवीन अंदाजात सादर करून त्यांनी पुणेकरांची मने जिंकली… त्यानंतर सादर झालेल्या ‘मला आई व्हायचंय चित्रपटातील ‘तुझं माझ्याशी नातं हे असं कसं आहे ‘ या गाण्याचा सादरीकरणानंतर रसिकांचे डोळे पाणावले. ‘तेरा जिस्म ओढ लू’…’सुनो ना, संगमरमर की ये मीनारें’ या गीतांच्या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, महोत्सवाची सांगता सोमवार, दि. २३ मार्च रोजी पहिल्या सत्रात स्वरप्रज्ञा पं. मिलिंद रायकर, यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन जुगलबंदीने आणि दुस-या सत्रात पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांचा भावसरगम या स्वरमैफलीने होणार आहे. रसिकांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटर समोरील नू.म.वि. मराठी शाळा येथे करण्यात आली आहे. संगीत महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

  • फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे गणपती मंदिराच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कुणाल गांजावाला लाईव्ह इन कॉन्सर्ट कार्यक्रम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी