March 24, 2026

​पुण्यात ‘MH Women Excellence – 2026’ सोहळा उत्साहात संपन्न; महाराष्ट्रातील १६ क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

0
IMG-20260323-WA0076
Spread the love


​पुणे:
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘युनाय फाउंडेशन’ तर्फे आयोजित ‘MH Women Excellence – 2026’ हा राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार सोहळा शनिवारी पुण्यातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यांमधून आलेल्या नामांकनांमधून १६ विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
​मान्यवरांची उपस्थिती
​ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त मा. रुक्मिणीताई गलांडे, पुणे , प्रमुख वक्त्या मा. ॲड. अदिती निटुरे आणि विमेन लीडरशिप प्रोग्राम हेड मा. गौरी निगुडकर उपस्थित होत्या.
​विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान
​या सोहळ्यात सामाजिक, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, कला, साहित्य, क्रीडा, संशोधन, शिक्षण आणि उद्योजकता यांसारख्या १६ विविध श्रेणींमध्ये महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. समाजाच्या तळागाळात राहून असामान्य कामगिरी करणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल या व्यासपीठावरून घेण्यात आली.
​आयोजकांची भूमिका
​युनाय फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्षा मा. मायाश्री गायकवाड आणि सचिव मा. बरखा लाहोटी यांनी या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “महिलांना अधिक आत्मविश्वासाने आणि प्रेरणेने समाजोपयोगी कार्य करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा सोहळा आयोजित केला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांच्या वाढत्या कर्तृत्वाचे प्रतीक आहे.”
​या कार्यक्रमाला पुण्याच्या विविध भागांतील नगरसेविका, सामाजिक कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन युनाय फाउंडेशनच्या टीमने यशस्वीपणे केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी