March 20, 2026

‘टू सेंटस’ परिवर्तनाचे एक सखोल चिंतनमंत्री मंगल प्रभात लोढा यांची भावनाः लेखिका बगसारवाला यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

0
IMG-20260318-WA0021
Spread the love

पुणे, दि. १८ मार्च : ” टू सेंट्स ही एक गहन आणि शांत कलाकृती आहे. अनुभव, जबाबदारी आणि आंतरिक जागृतीच्या माध्यमातून स्त्रीच्या जीवनाबद्दलची विकसीत होणार्‍या गोष्टीचा मागोवा घेेते. काळानुसार स्मृती, अर्थामध्ये होणारे बदल आणि जीवनातील विरोधाभासाचे अनेक सत्ये कशी समावली जाऊ शकतात याचे एक रुपक आहे.” अशी भावना महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केली.
लेखिका अलेफिया बगसारवाला यांनी लिहिलेल्या ‘टू सेंट्सः नोट्स ऑफ अ यंग विडो’ या पुस्तकाच्या प्रकाशन वेळी ते बोलत होते. तसेच
अजिंक्य डी.वाय.पाटील ग्रुप चे कुलपती डॉ अजिंक्य डी.वाय.पाटील यांनी पुस्तका बद्दल विशेष संदेश दिला आहे.
या प्रसंगी लेखिका अलेफिया बागसरवाला यांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सन्मानानंतर लेखिका अलेफिया बगसारवाल म्हणाल्या की,” वैयक्तिक अनुभव आणि समाजिक समस्या दर्शवणार्‍या कथा लिहित राहण्यास आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यास प्रोत्साहन मिळते. हे पुस्तक जीवनप्रवास उलगडते. यात प्रेम, मनःशांती आणि वैधव्य सारख्या विषयांचा शोध घेतला आहे. अत्तर आणि कवितेच्या माध्यमातून सांगितलेला हा प्रवास भारतीय विधवांची स्थिती आणि परिस्थिती याबद्दलच्या एक महत्वाच्या सामाजिक संदेशालाही स्पर्श करते.”
लेखिकाने आपल्या पतीच्या निधनानंतर टू सेंट्स पुस्तक लिहिले. यात भावना व आठवणींचा संग्रह आहे. हा वैयक्तिक वृत्तांत नसून परिवर्तनावरील सखोल चिंतन आहे. स्त्रीने भूतकाळाशी सन्मानाने सामना कसा करावा, वर्तमानकाळ स्पष्टतेने कसे जगावे आणि नव्याने नियंत्रण मिळवून भविष्यात कसे पाऊल टाकावे याचा शोध घेते. हे पुस्तक वाचकांना चिंतन करायला व समजून घ्यायला प्रवृत्त करते.
हे आत्मचरित्र भावनिक उपचाराची अभिव्यक्ती म्हणून कथाकथन, कविता आणि प्रतिकात्मक उपहासाचा मिलाफ साधते. एखाद्या सुगंधाप्रमाणे रचलेल्या या पुस्तकात एक उपसंहारही आहे. भारतातील विविध ऐतिहासिक कालखंडांतील विधवांच्या सामाजिक स्थितीचे थोडक्यात विश्लेषण करते.
या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर समाजसेविका डॉ. मंजू लोढा यांनी प्रेरणादायी संदेश दिला आहे. तसेच डॉ. फिरोज पूनावाल, उमेश फरवानी, ऐमान मेहता, राबिया पटेल, अर्चना जैन, डॉ. मिकी मेहता आणि रिधिमा तिवारी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि उद्योगपतींनी पाठिंबा दर्शविला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी