March 20, 2026

होर्मूझ समुद्रधुनीतून भारतीय नौकांना मार्गक्रमण करून देण्याचे श्रेय परराष्ट्र मंत्री वा सरकारचे नव्हे.. तर भारतीय जनतेचे..!

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


—-
होर्मूज मधून भारतीय नौका सोडण्याचे श्रेय इराण कडून भारतीय जनतेस..!
—-
इराण प्रतिनिधी मंडळाचा खुलासा सत्य वास्तवतेवर आधारित …..
⁃ काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे :
देशाचे (भाषणजीवी) पंतप्रधान मोदी हे देशहिताचे निर्णय तत्परतेने घेत नाही, तेंव्हा ‘जनता आणि विपक्ष विदेशनीती हातात घेऊन राष्ट्रहित जपते’ याचा प्रत्यय ईराण’च्या निर्णय प्रक्रियेतून आल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
इराणने भारताचे दोन जहाज होर्मुज मधून सोडताना भारत सरकार’चा स्पष्ट अनुल्लेख करून, संपूर्ण श्रेय स्पष्टरित्या ‘भारतीय जनतेला’ दिले असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भारताचा जुना मित्र इराणला जेंव्हा दुष्ट प्रवृत्तीचा इज्राइल धमक्या देत होता, तेंव्हा असंख्य देशांनी अटक वारंट काढलेल्या इज्राइलच्या नेतान्याहूने पंतप्रधान मोदींना तातडीने बोलावून घेतले व एक मेडल (पुरस्कार) बहाल केला* (गळ्यात बांधला) आणि आपल्या कुकर्मांना भारताची अप्रत्यक्ष स्वीकृती मिळवून घेत, दुसऱ्या दिवशी इराणवर इज्राइल आणि अमेरिकेने हल्ला केला, इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनींना मृत्यूस सामोरे जावे लागले, मात्र पारंपरिक मित्र असलेल्या भारत सरकारने, साधा शोक संदेश ही तत्परतेने दिला नसल्याचा *तर *अत्यंत विलंबाने दिल्याचा आरोप ही त्यांनी केला.
भारतीय जनता’ मात्र इराणवर झालेल्या या अत्याचारामुळे दुखावली, इराणचे समर्थन आणि शहिद अली खोमेनी यांच्या समर्थनार्थ शोक संदेशांचा देशात पाऊस पडला.
भारत सरकारच्या अश्या वागण्यामुळे दुखावलेला इराण, ‘भारतीय जनतेच्या प्रेमाने’ मात्र निश्चितच सुखावला.
तसेच, इराण’चे पूर्णतः निशस्त्र युद्धक जहाज भारताच्या आमंत्रणावर विशाखापट्टण येथे आले होते, त्याच्या सैनिकांनी विशाखापट्टणमच्या रस्त्यावर भारतीय राष्ट्रपतींना सलामी दिली मात्र परतीच्या प्रवासात (भारताच्या जवळच) अमेरिकेने युद्ध नियम धाब्यावर ठेऊन, या निःशस्त्र जहाजाला बुडवले. जहाजातून आपत्तीचा एसओएस कॉल प्रथम भारताला देण्यात आला होता पण भारत सरकारला बुडणाऱ्या इराणी प्रवाशांना वाचवण्याची कदाचित अमेरिकडून अनुमती मिळाली नसावी म्हणूनच भारत सरकारने वा सैन्याने पावले उचलली नसावीत अशी उपहासात्मक टिका ही काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
त्याचवेळी लहानशा श्रीलंकेने मात्र कसल्याही अनुमतीची पर्वा न करता आपल्या छोट्याश्या कुवतीने जमेल तितक्या इराणी लोकांना वाचवले याकडे ही त्यांनी लक्ष वेधले.
भारत सरकारने पुन्हा साधा ‘शोक संदेश’ ही दिला नाही का अमेरिकेच्या दबावाखाली भारत सरकार हे करू शकले नाही.. (?) असा संतप्त सवाल की काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
भारतीय जनता पुन्हा हळहळली, शोक संदेशांचा आणि आपल्याच सरकारच्या निर्भर्त्सनेचा देशात विविध माध्यमांवर पाऊस पडला. देशाच्या विदेशनीतीची व भारताच्या सार्वभौमत्वाची अशी दुर्गती पाहून, विपक्षाने सूत्रे आपल्या हातात घेतली.
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी यावर देशातील प्रमुख माध्यमातून विस्तृत लेख लिहून, ‘सद्य स्थितीतील भारत सरकारची नीती ही भारताची नीती नाही, भारतीय जनतेची ही नीती नाही, हा भारतीय जनमानसाचा दृष्टिकोन नाही, हे साऱ्या जगासमोर विशेषतः इराणसमोर स्पष्ट केले.
त्याचीच् परिणीती म्हणजे इराणने भारताचे दोन जहाज होर्मुजतून सोडले आणि हा ‘मित्रत्वाचा, संवेदनशीलता* व आत्मियतेचा* भाव’ भारत सरकार मुळे नसून ‘भारतीय जनतेचा’ आहे हे अगदी इराण’ने स्पष्ट शब्दात सांगितले.
अश्या रितीने भारतातील जनता आणि विरोधी पक्ष’ यांनी विदेश नीतीत कृतीशील पुढाकार घेऊन युद्धजन्य परिस्थितीत ‘भारतास संभाव्य ऊर्जा संकटपासून काही काळ वाचवण्याचा प्रयत्न केला’ याचे श्रेय काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या व लोकसभेच्या माजी विरोधीपक्ष नेत्या श्रीमती सोनियाची गांधी यांना व देशातील संवेदनशील व मानवतावादी ईराणप्रेमी सामाजिक घटकांना जात असल्याचे काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी