पुणे बिझनेस क्लब ऑफिसला प्रार्थना बेहेरे अभिजीत खांडकेकर आणि शीतल सूर्यवंशी यांची भेट
पुणे, [तारीख] – पुणे बिझनेस क्लबला प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, प्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि ‘सखे गं साजणी’ चित्रपटाच्या असोसिएट प्रोड्युसर, जिजा ज्वेलरी स्टुडिओ च्या संचालिका शितल सूर्यवंशी यांची विशेष भेट मिळाली. या भेटीत त्यांनी क्लबच्या कार्याची प्रशंसा केली आणि उद्योजकांना प्रोत्साहन दिले
त्यांच्या बहुचर्चित आगामी चित्रपट ‘सखे ग साजणी’ जो येत्या 3 एप्रिलला सर्व चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे त्याचे प्रमोशन हे खास निमित्त असल्यामुळे त्याविषयीचे विशेष व्हिडिओ सयोग स्टुडिओमध्ये करण्यात आले
पुणे बिझनेस क्लब हे उद्योजकांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे, जिथे मासिक बिजनेस मीटिंग, ऑनलाईन आणि ऑफलाईन इव्हेंट्स, एक्जीबिशन्स व व्यवसाय पूरक उपक्रम आयोजित केले जातात. क्लबच्या संचालिका संस्थापिका सपना योगेश काकडे यांनी या माध्यमातून हजारो महिला उद्योजिका जोडल्या असून त्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सतत प्रोत्साहन मिळते.सहसंचालक योगेश काकडे यांनी उद्योजकांसाठी नवीन सिनर्जी सेगमेंट लॉन्च केले आहे, जे उद्योजकांना नवीन संधी प्रदान करेल.
