March 19, 2026

रा.स्व.संघाची – संघ शताब्दीच्या माध्यमातून यशोगाथा मांडत मध्य पुण्यात भव्य शोभायात्राहिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजन ; विविध चित्ररथांचा सहभाग

0
IMG-20260319-WA0068
Spread the love


पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त संघाची यशोगाथा सांगणारा संघ शताब्दी रथ…जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष रथ…क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मराठी शाळा याविषयी माहिती देणारा समरसता रथ, छत्रपती शिवाजी महाराज रथ, सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे यांचा रथ अशा एकापाठोपाठ एक आलेल्या चित्ररथांचा सहभाग गुढीपाडव्याच्या मंगलमय सकाळी पुण्यात अनुभवायला मिळाला. याचसोबत पारंपारिक नगारा, ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, मर्दानी खेळ, मल्लखांब, वेत्रचर्म पथक, लहान मुलींचे साहसी आणि धाडसी खेळ इ. या भव्य शोभायात्रेत सहभागी झाले होते.

गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्ताने यंदाच्या वर्षी संघाचे ज्येष्ठ प्रचारक पंत फडके आणि भाऊराव क्षीरसागर यांच्या हस्ते तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे गुढी उभारण्यात आली. त्यांच्यासोबत कसबा भागाचे संघचालक प्रशांत यादव, मोतीबाग नगराचे संघचालक शरद चंद्रचूड, मोतीबाग नगराचे कार्यवाह प्रमोद वसगडेकर, अश्विन देवळणकर, प्रदीप कदम इ. मान्यवर उपस्थित होते.

या भव्य दिव्य शोभायात्रेत खा. मेधा कुलकर्णी, आ. हेमंत रासने, नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, स्वरदा बापट, निवेदिता एकबोटे इ. मान्यवर उपस्थित होते. त्याचसोबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, गजानन मित्र मंडळाचे सागर दहिभाते, जोगेश्वरी मंदिराचे बेंद्रे, जिलब्या मारुती मंडळाचे राजाभाऊ धावडे, सो. क्ष. कासार कालिका माता देवस्थान समितीचे भांडेकर, नवनीत मित्र मंडळाचे संतोष फडतरे, अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव समितीचे निलेश खडके, अमर भालेराव, इ. चा उत्स्फूर्त सहभाग होता. यावेळी हिंदू नववर्ष स्वागत समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर व सहसंयोजक चैतन्य कुसुरकर, यात्रा प्रमुख गौरव पावटेकर, अथर्व दातार यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

एकत्र होऊनिया सारे… गुढी उभारु हिंदुत्वाची असे म्हणत पारंपरिक वेशात सहभागी पुणेकरांनी शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. परिसरातील गणेश मंडळांचाही तितकाच उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट, मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती मंडळ, नवनीत मित्र मंडळ, अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव समिती, कालिका माता देवस्थान समिती, अखिल शनिवार पेठ रामनवमी उत्सव समिती, श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, ट्रस्ट यांनी देखील सहभाग घेतला. लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरु झालेली शोभायात्रा तुळशीबाग राममंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर पर्यंत काढण्यात आली. यावेळी गुढी देखील उभारण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी