अतिक्रमण कारवाई म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात…
2) साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन मधील शेड वर कारवाई, पण व्यवसाय सुरूच… याबाबत चे धोरण काय ?
मा. महोदय,
सर्वप्रथम मी केलेल्या तक्रारीवरून नदीपात्रात काल कारवाई करण्यात आली तसेच कर्वेनगर, ताथवडे उद्यान परिसरात देखील फ्रंट मार्जिन व साईड मार्जिन मधील शेड वर कारवाई करण्यात आली.
मात्र ही कारवाई म्हणजे तात्पुरती डागडुजी किंवा धुळफेक असल्याचे दिसून येते. मनपा ने काल केलेल्या कारवाई ची आजच्या वृत्तपत्रात प्रसिद्धी देखील केली आहे.
मात्र आत्ता नदीपात्रात पाहणी केली असता सर्व जैसे थे आहे. यांना लगेचच सामान परत कसे मिळते ? याबाबत मनपा चे काय धोरण आहे किंवा कायद्यात काय कारवाई प्रस्तावित आहे त्याची माहिती द्यावी.
तसेच साईड मार्जिन व फ्रंट मार्जिन मधील पत्र्याच्या शेड वर कारवाई झाली… 2/4 दिवसात त्या पुन्हा उभारल्या जातील याची खात्री आहेच !! मात्र त्या जागेत विविध वस्तू विक्री सुरूच असून असा व्यवसाय करणे कायद्यास धरून आहे काय याची ही माहिती द्यावी.
अतिक्रमण कारवाई बाबतीत कठोर भूमिका घेतल्याशिवाय शहराचा कायापालट होणे अशक्य आहे. तरी याबाबत कारवाई करावी अशी पुनःश्च मागणी करत आहे.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष – क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995
