March 17, 2026

चांदणी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी

0
IMG-20260317-WA0014
Spread the love

आंबेडकर जयंती पूर्वतयारी बैठकीत प्रस्ताव; जागा मिळाल्यास पुतळा देण्याची उमेश कांबळे यांची तयारी

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेत पूर्वतयारीसाठी विशेष बैठक पुणे महापालिकेत आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत चांदणी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे युवक राज्य संघटक उमेश कांबळे यांनी केली, तसेच जागा मिळाल्यास पुतळा देण्याची तयारी उमेश कांबळे यांनी दर्शविली.

या बैठकीला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम तसेच महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, पोलीस अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंबेडकर चळवळीतील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, विविध मंडळांचे अध्यक्ष व सदस्य देखील उपस्थित होते.

बैठकीदरम्यान उपस्थितांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली. त्यावेळी पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या दृष्टीने शहराचे पश्चिम प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या चांदणी चौक येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना संबंधित उमेश कांबळे यांनी सांगितले की, पुणे महानगरपालिकेने यासाठी योग्य जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या ‘विकास प्रतिष्ठान’ संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा महानगरपालिकेला देण्याची तयारी आहे. या प्रस्तावाला उपस्थितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी