March 16, 2026

‘दोराबजी हाइट्स’ची खास ऑफर जाहीर; २ बीएचकेच्या किमतीत ३ बीएचके

0
Screenshot_20260317_001027_WhatsApp
Spread the love

– अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीत गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर घोषणा
पुणे : उंड्री परिसरात उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक निवासी प्रकल्प ‘दोराबजी हाइट्स’मध्ये घर खरेदीदारांसाठी आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आली आहे. गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत २ बीएचकेच्या किमतीत ३ बीएचके फ्लॅट देण्याची विशेष घोषणा करण्यात आली. या प्रकल्पातील फ्लॅट्सची किंमत ८१ लाख रुपयांपासून सुरू होत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
बांधकाम क्षेत्रातील विश्वासार्ह नाव म्हणून ओळख असलेल्या दोराबजी समूहाचा हा प्रकल्प असून त्याची उभारणी दोराबजी, मन्नत असोशीएट आणि रितेश अग्रवाल व्हेंचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज, प्रशस्त आणि निसर्गरम्य परिसरात उभारला जाणारा हा प्रकल्प घर खरेदीदारांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
या प्रसंगी जहांगीर दोराबजी, डॅनियल दोराबजी, रितेश अग्रवाल व्हेंचर्सचे संस्थापक सतीश अग्रवाल, संचालक रितेश अग्रवाल, मनीष अग्रवाल, अंकुश अग्रवाल, अभिनेत्री प्राजक्ता माळी, अभिनेत्री शीतल ढेकळे, अमन घई तसेच मन्नत असोशीएटचे सर्व संचालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाल्या, “प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःच्या स्वप्नातील घर असावे, ही मोठी इच्छा असते. घरात भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा आणि सकारात्मक वातावरण असणे तितकेच महत्त्वाचे असते. दोराबजी हाइट्सच्या सदनिकांमध्ये या सर्व गोष्टींचा उत्तम समतोल साधलेला आहे. वास्तुशास्त्रानुसार पूर्व-पश्चिम प्रवेशद्वार असणे ही खास बाब आहे. प्रशस्त जागा, सुंदर रचना आणि मोक्याचे स्थान यामुळे हा प्रकल्प खरेदीदारांसाठी आकर्षक ठरेल. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर किफायतशीर दरात उत्तम घर मिळविण्याची ही चांगली संधी आहे.”
जहांगीर दोराबजी म्हणाले, “वास्तुशास्त्र हे एक विज्ञान असून त्यानुसारच आमचे प्रकल्प उभारले जातात. आमचा कॅपिटल बिल्ट-अप रेशो कमी असल्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत प्रशस्त आणि प्रीमियम सदनिका उपलब्ध करून देणे शक्य होते. मोठ्या आणि आरामदायी फ्लॅट्स ही आमची खासियत असून या प्रकल्पात २ बीएचकेच्या किमतीत ३ बीएचके देण्याची ऑफर ग्राहकांसाठी खास ठरणार आहे.”
अभिनेत्री शीतल ढेकळे म्हणाल्या, “दोराबजी हाइट्स हा प्रकल्प निसर्गरम्य परिसरात असून येथील वातावरण अतिशय सकारात्मक आणि आनंददायी आहे. येथील फ्लॅट्स अत्यंत प्रशस्त असून मध्यवर्गीय कुटुंबालाही परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन घराच्या शोधात असलेल्या नागरिकांनी या प्रकल्पाला नक्की भेट द्यावी.”
रितेश अग्रवाल यांनी सांगितले की, “दोराबजी हाइट्समध्ये ३० हून अधिक अत्याधुनिक अॅमेनिटीज देण्यात येत आहेत. हिलसाइड व्ह्यू, शांत निवासी परिसर आणि शाळा, रुग्णालये, मॉल्स तसेच हायस्ट्रीटसारख्या पायाभूत सुविधांच्या जवळ हा प्रकल्प आहे. येथे स्विमिंग पूल, दोन कम्युनिटी हॉल, मल्टी-क्युजिन रेस्टॉरंट, कार्यक्रमांसाठी ओपन एरिया, रुफटॉप सुविधा यांसह कंट्री क्लबचे मोफत सदस्यत्वही देण्यात येणार आहे.”
अंकुश अग्रवाल यांनी सांगितले की, गुढी पाडव्याच्या निमित्ताने फ्लॅट बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष आकर्षण ठेवण्यात आले आहे. फ्लॅट बुक करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आकर्षक गिफ्ट हॅम्पर दिले जाणार असून सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत फोटो काढण्याची खास संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी