March 16, 2026

तेल व गॅस वितरकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे – महेश गुप्ता

0
IMG-20260316-WA0039
Spread the love

पुणे : भारतीय जनता पार्टी, व्यापारी आघाडी – पुणे शहर यांच्या वतीने सर्व तेल व गॅस ऑपरेटर कंपन्या, वितरक व एजन्सींना शासनाने निर्धारित केलेल्या धोरणे व मार्गदर्शक सूचनांनुसारच गॅस व इंधनाचे वितरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, हॉटेल व्यवसाय तसेच उद्योग क्षेत्राला नियमित, पारदर्शक आणि सुरळीत पुरवठा मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत भाजपा व्यापारी आघाडी, पुणे शहरचे अध्यक्ष महेश गुप्ता यांनी व्यक्त केले.

घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी (हॉटेल, उद्योग इ.) गॅस व इंधनाचा योग्य आणि नियमानुसार पुरवठा होणे आवश्यक असून, वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखणे ही सर्व वितरकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच अवैध साठेबाजी, कृत्रिम तुटवडा निर्माण करणे किंवा काळाबाजार यांसारखे प्रकार आढळल्यास संबंधित एजन्सी व जबाबदार व्यक्तींविरुद्ध प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे ही सर्व वितरकांची प्राथमिक जबाबदारी असल्याचेही महेश गुप्ता यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी