March 15, 2026

विशाल छुगेरा प्रॉपर्टीजतर्फे चॅनेल पार्टनर्स संमेलनाचे आयोजन

0
IMG-20260314-WA0035
Spread the love

पुणे: एन. ए. प्लॉटिंग क्षेत्रातील अग्रणी विशाल छुगेरा (व्ही. सी. प्रॉपर्टीज) पुढाकाराने विमाननगर येथील हॉटेल ग्रँड हयात येथे आयोजित चॅनेल पार्टनर्स संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे आणि परिसरात रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास ६०० व्यावसायिकांनी संमेलनाला हजेरी लावत व्ही. सी. प्रॉपर्टीजच्या बंगलो प्रकल्पांविषयी जाणून घेतले. कंपनीच्या आगामी प्रकल्पांची संकल्पना, त्यामागील नियोजन, तसेच ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि गुंतवणुकीच्या संधी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. व्ही. सी. प्रॉपर्टीजचे चेअरमन विशाल छुगेरा, संचालक अमन छुगेरा व क्रिश छुगेरा, मार्गदर्शक व सल्लागार दर्शन चावला आणि किशन मिलानी उपस्थित होते.

विशाल छुगेरा म्हणाले, “रिअल इस्टेट क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि गुणवत्तेला सर्वाधिक महत्त्व आहे. ग्राहकांच्या अपेक्षा ओळखून त्यानुसार नियोजनबद्ध प्रकल्प उभारणे ही आमची प्राथमिकता आहे. एन.ए. प्लॉटिंग आणि बंगलो प्रकल्पांच्या माध्यमातून आम्ही गुंतवणूकदार आणि घर खरेदीदारांना सुरक्षित व दीर्घकालीन मूल्य देण्याचा प्रयत्न करत आहोत. पुणे आणि आसपासच्या परिसरात वाढत्या नागरीकरणामुळे स्वतंत्र घर, बंगलो प्रकल्प आणि प्लॉटिंगला मोठी मागणी निर्माण होत आहे. नियोजनबद्ध पायाभूत सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि नैसर्गिक वातावरणाचा समतोल राखत प्रकल्प विकसित करण्यावर कंपनीचा भर आहे. ‘जमीन विकत घ्या, देव आता ती बनवत नाही’ प्रॉपर्टीजचा असा नारा आहे.”

“व्ही. सी. प्रॉपर्टीज गेल्या २१ वर्षांपासून एन. ए. प्लॉटिंग आणि बंगलो प्रकल्पांमध्ये कार्यरत असून, प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आमच्या ब्रँड अँबेसेडर आहेत. आजवर १५ पेक्षा अधिक प्रकल्पातून, २५०० हुन अधिक समाधानी ग्राहकांना लाखो स्क्वेअर फूट जमीन आम्ही विकली आहे. पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या केसनंद येथे निवान मेडोस हा ८० एकरात, तर बकोरी येथे निवान ग्रॅंड्युअर २५ एकरात असे दोन बंगलो प्रकल्प आहेत. चॅनेल किंवा ग्रोथ पार्टनर्स आमच्या व्यवसायाचा कणा असून, या प्रकल्पांतून त्यांना उत्तम व्यवसाय मिळावा, गुंतवणूकदारांना लाभ व्हावा, ज्यांना आपले पहिले घर बंगला व्हावे, असे वाटते, त्यांना ही संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

या संमेलनाच्या माध्यमातून चॅनेल पार्टनर्सना कंपनीच्या विविध प्रकल्पांची माहिती देण्याबरोबरच त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध झाली. कार्यक्रमादरम्यान रिअल इस्टेट क्षेत्रातील बदलते ट्रेंड, गुंतवणुकीच्या संधी आणि ग्राहकांच्या अपेक्षा यावरही चर्चा करण्यात आली. संमेलनाच्या शेवटी उपस्थित चॅनेल पार्टनर्सशी संवाद साधत कंपनीच्या आगामी योजनांविषयी माहिती देण्यात आली. सहभागी व्यावसायिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यात अशा प्रकारच्या संमेलनांमुळे उद्योगातील सहकार्य आणि संवाद अधिक दृढ होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी