March 15, 2026

महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाच्या गदेचे पूजन

0
IMG-20260311-WA0034(1)
Spread the love

मुंबई : वर्षा या शासकीय निवासस्थानी ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण व मानाच्या गदेचे पूजन राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने या भव्य स्पर्धेचे आयोजन दिनांक १८ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत वाघोली, पुणे याठिकाणी करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पर्धेच्या नियोजनाची सविस्तर माहिती घेत आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले व स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.

सदर स्पर्धेच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी विजेत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी देऊन गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष मा. मुरलीधरजी मोहोळ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पै. योगेश दोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, नगरसेवक अनिल सातव पाटील तसेच कृष्णाजी बुचडे, नटराज सातव पाटील, सुनील (चाचा) जाधवराव, राहुल सातव, केतन जाधव, सागर सातव, महेश माने, मुकेश सातव, संदीप वारे, मयूर सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी