March 14, 2026

जागतिक कॅरम विजेती रश्मी कुमारी यांच्या हस्ते ‘नॅशनल पीएनजी ड्राईव्ह २.०’ अंतर्गत पीएनजी पुरवठ्याचा औंधमध्ये शुभारंभ

0
IMG-20260314-WA0036
Spread the love

पुणे: पर्यावरणपूरक इंधनाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ (MNGL) आणि ‘पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ’ (PNGRB) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नॅशनल पीएनजी ड्राईव्ह 2.0’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत, औंध येथील ‘सिल्वन हाईट्स’ (Sylvan Heights) या गृहनिर्माण संस्थेमध्ये घरगुती पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) कनेक्शनचे औपचारिक उद्घाटन उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जागतिक कॅरम विजेत्या रश्मी कुमारी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते नवीन गॅस कनेक्शनचे उद्घाटन करण्यात आले. सध्या मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. अशा कठीण काळात ‘एमएनजीएल’च्या माध्यमातून सुरक्षित आणि अखंडित पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) पुरवठा सुरू झाल्याने सोसायटीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘नॅशनल पीएनजी ड्राईव्ह 2.0’च्या माध्यमातून जास्तीत जास्त घरांपर्यंत नैसर्गिक वायू पोहोचवून इंधन बचतीचा संकल्प यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

जागतिक कॅरेम विजेत्या रश्मी कुमारी म्हणाल्या की, “मध्य पूर्वेतील देशांतील परिस्थितीमुळे अनेकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यावर पीएनजी हा उत्तम पर्याय असून, यामुळे गॅस सिलिंडरसाठी होणारी धावपळ थांबेल. जास्तीत जास्त नागरिकांनी एमएनजीएलच्या पीएनजी सुविधेचा स्वीकार करावा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सिल्वन हाईट्सच्या रहिवाशांनी एमएनजीएलचे आभार मानले. या सोसायटीमध्ये ३०० कुटुंबे राहत असून, सध्याची परिस्थिती पाहता अतिशय योग्य वेळी एमएनजीएलची ही सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे आता गॅस सिलिंडरचे बुकिंग आणि वितरणासाठी लागणाऱ्या वेळेतून आमची मुक्तता झाली आहे.

यावेळी एमएनजीएलचे सुजित रुईकर, सचिन काळे, अमोल हत्ती, लोकेश सरोदे यांच्यासह सिल्वन हाईट्स सोसायटीचे सुजाता पाटील, प्रेम मेनन, चिराग बक्षी, चिराग दलाल, दीपक दलाल, किरण हर्डीकर, रामामूर्ती अर्चना दलाल, जुई कुडव, सोनल बर्वे, सुप्रिया व्यास, श्रीरंग नाईक, धनंजय हर्डीकर आणि लीला अफजलपूरकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी