छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातून मानवंदनाशिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे सलग १३ वर्षे भव्य रक्तदान मानवंदनेचे यशस्वी आयोजन ; १०० स्वराज्यघराण्यांचा आणि महाराष्ट्रातील शिवशंभू भक्तांचा सहभाग
पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान दिनी रक्तदानातून मानवंदना देण्यात आली. मानवंदनेचे हे सलग १३ वे वर्ष आहे. जिजाऊमॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी होणाऱ्या तब्बल १०० स्वराज्यघराण्यांच्या वंशजांनी, ढोलताशा पथकांनी, क्रिडा संघटनांनी, गणेशोत्सव मंडळांनी डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे आयोजित रक्तदान मानवंदनेत सहभाग नोंदवला.
मानवंदनेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला. यावेळी रक्तदान मानंवंदनेचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड , सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, मंगेश शिळीमकर, रिंकल अमित गायकवाड तसेच स्वराज्यघराण्यांचे प्रतिनीधी उपस्थित होते.
रक्तदान मानवंदनेची सुरुवात ईशान अमित गायकवाड, सचिन पायगुडे, अविनाश कडू, प्रिया मोहन पासलकर, किरण शितोळे, ऋषीकेश पासलकर, मंगेश शिळीमकर, राजेश जोगदंड, सुनील जोगदंड, दादा भोसले, बाजीराव निगडे, विलास भिलारे, निलेश दरेकर, पिहूतोष पायगुडे, गणेश पायगुडे यांनी रक्तदान करुन केली.
यावेळी कडू, गायकवाड, पायगुडे, दरेकर, पासलकर, निगडे, ढमंढेरे. शिळीमकर, जेधे, शितोळे, पवार, जगताप, माने, जाधव, बाबर, भिलारे, तापकीर, चव्हाण, मालुसरे, सोनवणे, वाबळे, खोपडे, साळुंखे, काटे, शिंदे, कामठे यासह अनेक स्वराज्यघराण्यांनी रक्तदाना मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. प्रथम क्रमांकाचे रक्तदाते म्हणून कडू स्वराज्यघराण्याचा, द्वितीय क्रमांकाचे रक्तदाते म्हणून गायकवाड स्वराज्यघराण्याचा आणि तृतीय क्रमांकाचे रक्तदाते म्हणून पायगुडे स्वराज्यघराण्याचा शंभू छत्रपतींचे मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. रक्तदात्यांचा संकल्प पुर्ण झाला. हिंजवडी रक्तपेढीने रक्त संकलन केले.
अमित गायकवाड म्हणाले, स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन ११ मार्च हा दिवस “महामृत्युंजय रक्दान दिन” म्हणुन महाराष्ट्र सरकारने जाहिर करावा अणि त्यादविशी संपुर्ण महाराष्ट्रातून रक्तदान चळवळीतून संभाजी महाराजांना मानवंदना द्यावी. ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी रक्ताचा थेंबनथेंब अर्पण केला स्वराज्याच रक्षण करण्यासाठी, भारतभूमीच रक्षण करण्यासाठी, भारताच्या गौरवशाली संस्कृतीच रक्षण करण्यासाठी त्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातुन मानवंदना देऊयात, रक्ताच पांग रक्ताने फेडूया, रक्ताच रक्ताशी नात जोडूयात हि जाणीव जपत आम्ही सलग १३ वर्षे रक्तदान मानवंदना आयोजित करीत आहोत आणि भविष्यात राज्यव्यापी मानवंदनचे आयोजन करण्यात येणार आहे.
फोटो ओळ : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमीत्त डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे रक्तदान मानवंदना कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड व उपस्थित मान्यवर.
