March 13, 2026

संसदेतील रिपब्लिकन योद्धाहॅटट्रिक करणारे संसदवीररामदास आठवले

0
ShyamPhotoWorld (19) copy
Spread the love

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा निळा झेंडा संपूर्ण देशात घेवून जाणारे दलित, बहुजनांचे संघर्ष नायक नेतृत्व ठरलेले लोकनेते केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले तिस-यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवडले गेले आहेत. राज्यसभेवर निवडुन येण्याची हॅट्रीक ना. रामदास आठवले यांनी साधली आहे. देशभरातील आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीतल राज्यसभेत हॅट्रीक साधणार नेतृत्व म्हणजे ना. रामदास आठवले आहेत. मागील वर्षभरापूर्वी 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांचे तिस-यांदा सरकार आले. तेव्हा ना. रामदास आठवले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची शपथ घेण्याची हॅट्रीक साधली आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयात सलग तिस-यांदा केंद्रीय राज्यमंत्री होण्याचा बहुमान केंद्रीय राज्यमंत्री पदाची हॅट्रीक ना. रामदास आठवले यांनी केली आहे. सबंध देशात तिस-यांदा विकास खात्याचा राज्यमंत्री होण्याचा बहुमान हा एक प्रकारचा विक्रम आहे. तो ना. रामदास आठवले यांनी केला आहे. त्यापूर्वी त्यांनी लोकसभेमध्ये सलग तिस-यांदा निवडुन येण्याचा विक्रमही ना. रामदास आठवले यांनी केला आहे.

1998 मध्ये मुंबईतुन, 1999 मध्ये पंढरपुर मधुन आणि 2004 मध्ये पंढरपुर मधुन ते सलग तीन वेळा लोकसभेमध्ये निवडुन आले. आणि लोकसभा खासदार होण्याची हॅट्रीक केलेली आहे. लोकसभेचा खासदार आणि राज्यसभेचा खासदार अशी दोन्ही ठिकाणी त्यांनी  हॅट्रीक साधल्यामुळे ते भारत देशातल्या रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतले एकमेव संसदवीर ठरलेले आहेत. राज्यसभेत हॅट्रीक, लोकसभेत हॅट्रीक आणि भारत सरकारच्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाचीही ना. रामदास आठवले हॅट्रीक साधणारा संसदवीर संबंध देशभरातील दलित बहुजन चळवळीचा अभिमान आहे. गोरगरीब जनतेचे, दीन दलितांच्या संकटामध्ये धावुन जावुन त्यांचे अश्रु पुसणारा, त्यांना मदत करणारा, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणारा, त्यांच्या कुटूंबातला एक नेता म्हणून ना. रामदास आठवले हे लोकनेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाची ही जादु आहे. प्रत्येक दलित बहुजन समाजाला ना. रामदास आठवले हे आपल्या कुटुंबातलेच वाटतात. आपले जवळचे वाटतात. आपल्या कुटुंबातील सदस्य वाटतात. ही कला, ही नेतृत्वाची जादु फार कमी लोकांमध्ये आहे. या नेतृत्वाचा जादुगार ना. रामदास आठवले आहेत. त्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा गेली 35 - 40 वर्ष महाराष्ट्र आणि भारतामध्ये कायम आहे.  

90 च्या दशकात त्यांनी कॉग्रेसला साथ दिली तेव्हा कॉग्रेस सत्तेवर होती. आणि राष्ट्रवादी कॉग्रेसला साथ दिली तेव्हा राष्ट्रवादी कॉग्रेस सत्तेत होती. मुंबईत त्यांनी शिवशक्ती-भिमशक्ती प्रयोग करुन सत्तेची भाकर फिरवली. त्याप्रमाणे शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली. शिवसेना भाजपची सत्ता आली. भाजपला साथ दिल्यानंतर भाजपचीही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सत्ता आली. त्यामुळे ना. रामदास आठवले हे ज्यांच्यासोबत जातात, सत्ता त्यांना मिळते. म्हणुन ते ज्या पक्षासोबत जातात त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. पंतप्रधान होतो, त्याबदल्यात ना. रामदास आठवले यांना सुध्दा मंत्रीपद मिळते. त्यामुळे ना. रामदास आठवले आणि त्यांचा रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत सत्ता ही त्यांच्यासोबत. महाराष्ट्रात आणि देशात किंगमेकर नेतृत्व म्हणून ना. रामदास आठवले यांच्याकडे पाहिल्या जातं.  

भारत देशामध्ये त्यांच्या नेतृत्चाने फार मोठा इतिहास घडविला आहे. लोकसभेत तीनवेळा खासदार, राज्यसभेत तीनवेळा खासदार आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयात तीनवेळा केंद्रीय राज्यमंत्री पद याचा बहुमान मिळवणारे हॅट्रीक साधणारे हे संसदवीर आहेत. याच वैशिष्ट म्हणजे ना. रामदास आठवले यांच्या स्वभावामध्येच खिलाडीवृत्ती आहे. ती खिलाडीवृत्ती असल्यामुळे अनेक मोठमोठया संसदेत होणा-या गंभीर चर्चेवर भांडणात, संवाद, वादविवादमध्ये  संसदेच वातावरण जेव्हा एकदम तापलेलं असत तेव्हा आपल्याच हास्य तुषार पसवणा-या चारोळया हे आपल्या अनोख्या अंदाजाने ते जेव्हा भाषण करतात. तेव्हा संसदेच वातावरण शांत आणि आनंददायी प्रसन्न होते.  तेव्हा या संसदेमध्ये संसदेची शान असणार हे रिपब्लिकन नेतृत्व आहे. त्यामुळे अपण ना. रामदास आठवले यांना संसदवीर म्हटल पाहिजे. या संसदेची ते शान आहेत. ना. रामदास आठवले यांच नेतृत्वच शानदार झालेलं आहे. त्यामुळे ना. रामदास आठवले हे कोणत्याही पक्षासोबत जावोत त्यांच वक्तृत्व संसदेमध्ये पाहिजे. ते जेव्हा संसदेमध्ये बोलत असतात संसदेतल्या सर्वांना आणि संसदेतल्या लाईव प्रेक्षपण पाहणा-या देशातील कोटयवधी जनतेला ना. रामदास आठवले यांच वक्तृत्व भावत असत. आणि आजही युटयुबरही त्यांची भाषणे पाहणारा त्यांचा चाहता वर्ग जगभर आहे. ना. रामदास आठवले यांची वक्तृत्वशैली ही जगभरामध्ये नावाजलेली आणि लोकप्रिय ठरलेली आहे. त्यामुळे ना. रामदास आठवले हे नेहमी जमिनीवर असणारे नेते आहेत. तीनदा केंद्रीयमंत्री, तीनदा लोकसभेत आणि तीनदा लोकसभेत खासदार झालेला नेता असतांनाही आजही ते राज्यसभेतुन गेल्यानंतर म्हणतात की, मी कार्यकर्ता आहे. ते स्वतला नेता नाही तर कार्यकर्ता मानतात. हेच त्यांच्या कामाच आणि यशाच गमक आहे. ते कधीही हवेत नसतात. प्रत्येकाला हवे असणारे नेते म्हणजे ना. रामदास आठवले आहेत. तरी सुध्दा ते कधीच हवेत राहत नाहीत ते जमिनीवर आहेत. जमिनीवर राहुनच ते लोकांचे प्रश्न सतत सोडवत असतात. सतत कार्यशील असणार नेतृत्व म्हणजे ना. रामदास आठवले हे आहेत. कितीही यश मिळालं तरी गर्वाची बाधा नसणारे, गर्वाचा वारा त्यांना जराही शिवत नाही. ते सदैव जमिनीवर राहतात. त्यामुळे ते प्रत्येकाला हवेहवेसे आहेत. विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो सर्वांना ना. रामदास आठवले हे हवे आहेत. मात्र ते सर्वांना हवे असले तरी ते कधीच हवेत राहत नाहीत. जमीन राहुनच ते लोकांचे प्रश्न सोडवतात.  

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर नसते तर मी कुठेच नसतो. ते कृतज्ञपणे मान्य करतात. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हाच प्रमाण मानुन ते त्यांची वाटचाल करतात. सर्व जातीधर्माच्या गरीब लोकांचे प्रश्न सोडवतात. दीन दलित, बहुजनांच्या न्यायासाठी ते लढतात. त्यांची सामाजिक चळवळीतली सुरुवातच दलित पँथर या आक्रमक संघटनेतुन झालेली आहे. त्यामुळे त्यांचा मुळ स्वभाव अन्यायावर प्रहार करणारा, अन्यायाचा प्रतिकार करणारा हा त्यांचा मुळ स्वभाव आहे. अन्यायाचा प्रतिकार करणारा हा दलित पँथर आजही समाजामध्ये एकोपा करण्यासाठी काम करतो. त्यांची भिमगर्जना ही जोडणारी आहे तोडणारी नाही. तेव्हा हा  तिस-यांदा पुन्हा राज्यसभेमध्ये निवडुन हा पँथर संसदेमध्ये त्यांच्या रुपाने भिमगर्जना गरजली जाणार आहे. भिमगर्जना अखिल भारतामध्ये रिपब्लिकन चळवळीचा निळा झेंडा उंच घेवुन जाणारी ठरणार आहे. अखिल भारतामध्ये सामाजिक न्यायाची पताका उंच करणारी ठरणार आहे. समाजा समाजामध्ये एकजुट करणारी ठरणार आहे. विषमतेवर भिम प्रहार करणारी ठरणार आहे आणि समतेची ज्योत जागवणारी त्यांची ही निवड ठरणार आहे.  

भगवान बुध्दांचा सत्य, अहिंसा, शांती, विश्वबंधुतेचा विचार घेवुन चालणारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बंधुतेचा, समतेचा विचार घेवून जाणारे रामदास आठवले हे ख-या अर्थाने दलित बहुजनांचे संघर्षनायक आहेत. या दलित बहुजनांचा बुलंद आवाज संसदेमध्ये जयभिम चा नारा बुलंद करणारा रामदास आठवले हा त्यांचा राज्यसभेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणुन त्यांचा जयभिम चा नारा बुलंद करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाचा प्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये राज्यसभेमध्ये बोलत आहे. असे ते अभिमानाने सांगतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा ते देशभरातील आंबेडकरी जनतेच प्रतिनिधीत्व राज्यसभेत ना. रामदास आठवले करत आहेत. त्यामुळे देशभरातील दलित बहुजनांना मनस्वी आनंद झालेला आहे. रामदास आठवले यांच्या राज्यसभेच्या हॅट्रीकचा बहुजनांना, दलितांना आनंद झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या हया निवडीच देशभरामध्ये प्रचंड स्वागत होत आहे. आणि रामदास आठवले दलित सवर्णांना जोडणारा दुवा आहेत. त्यांना गरिबांचा, दलितांचा बहुजनांचा आशिर्वाद लाभत आहे. सर्वांचे आशिर्वाद त्यांना लाभत आहेत. त्यामुळे ना. रामदास आठवले यांना प्रचंड बळ लाभो आणि दलितांचा बहुजनांचा हा पँथर संसदेमध्ये अशीच भिमगर्जना करीत राहो. राज्यसभेमध्ये त्यांची तिस-यांदा निवड झाल्याबद्दल दलित बहुजनांच्या आणि रिपब्लिकन संसदवीराला आम्ही शुभेच्छा देतो.

हेमंत रणपिसे
प्रसिद्धीप्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी