March 12, 2026

माजी उपपंतप्रधान, देशाचे संरक्षण, परराष्ट्र व गृहमंत्रीस्व. ‘वायबी’ उर्फ यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाची पाया भरणी झाल्याने चव्हाण साहेब ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ ठरल्याची स्तुती सुमने वहात काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी चव्हाण साहेबांना अभिवादनपर श्रद्धांजली वाहिली.

0
IMG-20260312-WA0042
Spread the love


राजीव गांधी स्मारक समिती’चे वतीने भोलाशेठ वांजळे यांनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या प्रसंगी मंडईतील चव्हाण यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
गोपाळदादा तिवारी पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कर्जाची क्षमता वाढली मात्र विद्यमान सरकार राज्यास कर्ज बाजारी करत असल्याची टिका ही त्यांनी केली.
महाराष्ट्रात धरणे आणि सिंचन प्रकल्पांना चव्हाण साहेबांनी प्राधान्य दीले ज्यामुळे शेतीला पाणी मिळाले, उत्पादन वाढले आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली.
उजनी (सोलापूर) जायकवाडी (संभाजीनगर): येडगाव धरण (कुकडी प्रकल्प) पुणे जिल्हा): कुकडी सिंचन योजने सह मनिकडोह, दिंभे, वडज, पिंपळगाव जोगे इ धरणांच्या ऊभारणीत यांचा समावेश आहे. पंचायत राज व्यवस्था, सहकार चळवळ, शिक्षण व औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ त्यांचेच काळात झाली याचे स्मरण ठेवत स्व यशवंतरावजी चव्हाण साहेबांना आदरांजली वहाण्यात आली.
या प्रसंगी सर्वश्री नंदुशेठ पापळ, धनंजय भिलारे, कामगार नेते राजेंद्र खराडे, उदय लेले, हरी महाले, शिवाजी सावंत, गणेश बुचडे, शुभम पाटोळे, भाऊ शेडगे, अँड श्रीकांत पाटील इ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी