March 11, 2026

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी पुण्यात धरणे आंदोलन

0
IMG-20260310-WA0027
Spread the love

पुणे : बिहारमधील गया येथे असलेल्या ऐतिहासिक ”महाबोधी महाविहार”च्या व्यवस्थापनाचा अधिकार पूर्णपणे बौद्ध धम्मियांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी पुण्यात धरणे आंदोलन करण्यात आले. आज  डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (जिल्हाधिकारी कार्यालयासमोर) येथे पुणे परिसरातील भिक्खू संघाच्या वतीने हे आंदोलन पार पडले.

या आंदोलनात भन्ते डॉ. नागघोष महाथेरो, भन्ते  बुद्धघोष महाथेरो,  भन्ते शाक्यपुत्र, भन्ते राजरत्न, शक्यपुत्र राहुल,धम्मरखीत, भन्ते पय्यारक्खीत,भन्ते धम्मानंद, भन्ते आनंद, भन्ते सचित बोधी, भन्ते मिलिंद, भन्ते प्रियदर्शी, भन्ते संघपाल, भन्ते  यश, यांच्यासह भिक्खू संघाचे सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी माजी आमदार जयदेव गायकवाड , राहुल डंबाळे, नगरसेवक नंदिनी धेंडे , नगरसेवक निलेश आल्हाट , बाळासाहेब जानराव , वसंतराव साळवे , शैलेश चव्हाण , भागवानराव वैराट, महेंद्र कांबळे , रोहिदास गायकवाड , निलेश गायकवाड यांच्यासह हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.

या आंदोलनात भिक्खू संघासह बौद्ध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्ध अनुयायांच्या ताब्यात देण्याची मागणी केली.

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, तथागत गौतम बुद्ध यांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली, त्या गया येथील महाबोधी महाविहाराची उभारणी प्राचीन काळात सम्राट अशोक यांनी केली होती. बौद्ध धर्मासाठी अत्यंत पवित्र असलेल्या या स्थळाचा हजारो वर्षांचा वारसा असूनही, सध्या त्याचे व्यवस्थापन बौद्धेतर व्यक्तींच्या ताब्यात असल्याचा मुद्दा आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

महाबोधी महाविहार हा जागतिक बौद्ध वारशाचा केंद्रबिंदू असून त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समाजाच्या देखरेखीखाली असावे, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. तसेच देशभरातील बौद्ध समाज या मागणीसाठी संघटित होत राष्ट्रव्यापी स्तरावर आंदोलन करत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, महाबोधी महाविहार मुक्तीसाठी पुढील काळातही संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी