March 10, 2026

शंभूबलिदान दिन हा ‘महामृत्युंजय रक्तदान दिन’ म्हणून जाहीर करावाअमित गायकवाड यांची महाराष्ट्र सरकारला मागणी ; शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे राजव्यापी भव्य रक्तदान मानवंदनेचे आवाहन

0
IMG-20260309-WA0051
Spread the love


पुणे : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन ११ मार्च हा दिवस ‘महामृत्युंजय रक्दान दिन’ म्हणून महाराष्ट्र सरकारने जाहीर करावा अणि त्यादविशी संपूर्ण महाराष्ट्रातून रक्तदान चळवळीतून संभाजी महाराजांना मानवंदना द्यावी, अशी मागणी शिवजयंती महोत्सव समिती, पुणेचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी केली आहे.

बुधवार, दि. ११ मार्च २०२६ रोजी शुभारंभ लॅान्स, म्हात्रे पूल डी पी रस्ता येथे सकाळी ९ ते ६ या वेळेत भव्य रक्तदान मानवंदनेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवजन्मोत्यव स्वराज्यरथ सोहळ्यातील वीर स्वराज्यघराणी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, वारकरी संप्रदाय, क्रिडा संघटना, सहकार, शिक्षण संस्था, वाहतूक संस्था, ढोलताशा पथके उपहार गृह संघटना, सिने कलाकार संघटना यासह विवीध क्षेत्रातील नागरिक सहभागी होणार आहेत.

अमित गायकवाड म्हणाले, ज्या स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी रक्ताचा थेंबनथेंब अर्पण केला. स्वराज्याच रक्षण करण्यासाठी, भारतभूमीच रक्षण करण्यासाठी, भारताच्या गौरवशाली संस्कृतीच रक्षण करण्यासाठी त्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातून मानवंदना देऊयात, रक्ताच पांग रक्ताने फेडूया रक्ताचे रक्ताशी नाते जोडूयात, हि जाणीव जपत गेली ११ वर्षे आम्ही रक्तदान मानवंदना आयोजित करीत आहोत. त्यामुळे आमचा संकल्प नक्कीच पूर्ण होईल याच आम्हाला विश्वास आहे.

यावेळी सचिन पायगुडे, रवींद्र कंक, समीर जाधवराव, शंकर कडू, निलेश जेधे, मंगेश शिळीमकर, गोपी पवार, किरण देसाई, सागर पवार, प्रवीणभय्या गायकवाड, मोहन पासलकर, किरण शितोळे, तसेच गणेशोत्सव मंडळे, वारकरी संप्रदाय, क्रिडा, शिक्षण संस्था, सिने कलाकार, ढोलताशा पथके यासह विवीध क्षेत्रातील समन्वयक उपस्थित होते.

या रक्तदान मानवंदनेमध्ये शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याच्या जिजाऊमॅासाहेब शहाजी महाराज शिवज्योत स्वराज्यरथाच्या नेतृत्वाखाली सहभागी सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, नरवीर तानाजी मालुसरे, अटकवीर सरदार मानाजी पायगुडे, कान्होजी नाईक कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, त्र्यंबकराव नाईक निंवगुणे, सरदार जैताजी नाईक करंजावणे, सरदार चांगोजी कडू, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुर्याजी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, सरसेनापती संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगदगुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, सरदार, पिलाजीराव शिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला धारदेवास, महाराष्ट्राचे श्रीमंत पवार घराणे, समशेर बहाद्दर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार, श्रीमंत महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक, शिवरत्न शिवा काशीद जीवा महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, शुरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, सरदार भोईटे, सरदार मांढरे, स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे,शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे,पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे, स्वराज्याचे निष्ठावंत सरदार दरेकर , स्वराज्याचे शिलेदार कुंजीर, स्वराज्यनिष्ठ शेळके, वीर फडतरे, राजे साळुंखे चालुक्य राजवंश, स्वराज्यनिष्ठ सरदार बाबर, सिंहगड वीर विठोजी कारके, दुर्ग अजिंक्यतारा वीर किल्लेदार मानाजी साबळे, शुरवीर सावंत स्वराज्यघराणे, सरदार मंबाजी नाईक सोनवणे, सरदार थोरात. सरदार वाबळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार रामजी पांगारे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, वीर बाजीप्रभु देशपांडे या स्वराज्यघराण्यांचे वंशज, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ढोलताशा पथके, विवीध संस्था सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी