March 9, 2026

पारंपरिक वेशात राजपूत महिलांचा ‘होली मिलन’ उत्सव साजरासमस्त राजपूत महिला संघ, पुणे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘होली मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन

0
IMG-20260308-WA0041
Spread the love


पुणे : पारंपरिक राजपूत वेशात सजलेल्या महिलांनी होळी मिलन कार्यक्रमात रंग, संस्कृती आणि परंपरेची अनोखी झलक साकारली. गीत-नृत्य, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उपस्थित महिलांनी रंगोत्सवाचा उत्साहात आनंद साजरा केला.

समस्त राजपूत महिला संघ, पुणे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त होली मिलन कार्यक्रमाचे आयोजन सहकारनगर जवळील सुरभी मंगल कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष मीनल यज्ञदत्तसिंह हजारे, पदाधिकारी पूनम परदेशी, अंजली परदेशी, पूनम हजारे, सरिता कनोजिया, श्रुती किराड व सहकारी उपस्थित होते. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत, महिलांनी पारंपरिक गीत आणि लोकनृत्य सादर केले. कार्यक्रमात विविध खेळ देखील घेण्यात आले.

मीनल हजारे म्हणाल्या, महिलांनी सशक्त बनत असताना आपल्या संस्कृतीचे जतन करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांवर उत्तम संस्कार करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने जिजाऊंचा आदर्श घ्यावा आणि समाजातील दुष्ट प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी झाशीची राणी व राणी पद्मिनी यांच्यासारखे धैर्य दाखवा, असेही त्यांनी सांगितले.

पूनम परदेशी म्हणाल्या, संस्थेच्या वतीने सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम राबवणे आणि राजपूतांचा गौरवशाली इतिहास, परंपरा व शौर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी महिलांसाठी ‘सावन मिलन’ कार्यक्रम, तलवारबाजी शिबीर तसेच विविध समाजसुधारकांची व्याख्याने असे विविध उपक्रम राबविले जातात, असेही त्यांनी सांगितले.

  • फोटो ओळ : समस्त राजपूत महिला संघ, पुणे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त होली मिलन कार्यक्रमाचे आयोजन सहकारनगर जवळील सुरभी मंगल कार्यालय येथे करण्यात आले. पारंपरिक राजपूत वेशात सजलेल्या महिलांनी होळी मिलन कार्यक्रमात रंग, संस्कृती आणि परंपरेची अनोखी झलक साकारली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी